Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: लग्नाला अवघे 6 दिवस… हातावरची मेहंदी अजूनही तशीच होती; माहेरी निघालेल्या नववधूला काळाने गाठलं!

जळगावमध्ये लग्नाला अवघे सहा दिवस झालेल्या 21 वर्षीय वैशाली भाऊसाहेब पाटील हिचा माहेरी जात असताना भीषण अपघातात मृत्यू झाला. भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात तिचे काका गंभीर जखमी झाले असून पोलिसांकडून अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 14, 2026 | 08:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाला अवघे सहा दिवस झालेल्या वैशाली पाटीलचा माहेरी जाताना अपघातात मृत्यू.
  • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील महामार्गावर भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिली.
  • अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
जळगाव: लग्नाच्या आनंदाला अवघे सहा दिवस उलटले होते. हातावरील मेहंदीचा रंगही अजून फिकट झाला नव्हता आणि माहेरी जाण्याचा आनंद मनात होता. मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. जळगाव शहरातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील महामार्गावर भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 21 वर्षीय नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील हिचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात तिचे काका गंभीर जखमी झाले असून अज्ञात वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

ग्रामस्थांच्या धाडसामुळे कुख्यात ‘दुधानी टोळी’ जेरबंद; झाडीझुडपातून थरारक पाठलाग करुन पकडले

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या नवविवाहितेचं नाव वैशाली भाऊसाहेब पाटील (वय 21) असं आहे. वैशालीचा विवाह 7 जुलै रोजी जळगावातील देवराम नगर येथे राहणारे विजय काशिनाथ पाटील यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नाला अवघे सहा दिवस झाले होते. विवाहानंतर नवदाम्पत्य देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर मांडव परतणीचा विधी आणि माहेरी जाण्यासाठी वैशालीचे काका तिला घेण्यासाठी जळगावला आले होते.

लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाणार असल्याने वैशाली खूप आनंदात होती. दुपारचे जेवण आटोपल्यानंतर ती काका प्रवीण सूर्याजी पाटील यांच्यासोबत दुचाकीवरून आपल्या मूळ गावी अमळनेर तालुक्यातील कोळपिंप्री येथे जाण्यासाठी निघाली. मात्र हा आनंदाचा प्रवास काही अंतरातच दुर्दैवी ठरला.

दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास, जळगाव शहरातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील महामार्गावर मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, वैशालीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर काका प्रवीण पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर चारचाकी वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला असून, या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

FDA Raid: छत्रपती संभाजीनगर हादरले! तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे संशयास्पद तेल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत नवविवाहितेचे नाव काय आहे?

    Ans: वैशाली भाऊसाहेब पाटील.

  • Que: अपघात नेमका कुठे झाला?

    Ans: जळगावमधील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील महामार्गावर.

  • Que: या अपघातानंतर पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Jalgaon crime just six days into the marriage the mehndi on her hands was still fresh tragedy struck the newlywed bride as she set out for her maternal home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
1

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा
2

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

Jalgaon News: पायांना साखळी, कुलूप अन् तापी नदीत मृतदेह! जोडप्याच्या हत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?
3

Jalgaon News: पायांना साखळी, कुलूप अन् तापी नदीत मृतदेह! जोडप्याच्या हत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
4

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.