Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: भुसावळमध्ये प्रेमविवाहाचा संताप; तरुणाला नग्न करून लोखंडी रॉडने गावभर मारहाण, 5 जण अटकेत

भुसावळ तालुक्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला नग्न करून खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी 10-12 जणांवर गुन्हा दाखल करून 5 जणांना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 22, 2026 | 11:01 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेमविवाहामुळे तरुणावर अमानुष मारहाण
  • नग्न करून गावभर फिरवले, लोखंडी रॉडने हल्ला
  • 10-12 आरोपींवर गुन्हा; 5 जण अटकेत
जळगाव: जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला नग्न करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमी तरुणाला रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना भुसावळ तालुक्यातील खडका गावात घडली.

Navi Mumbai: पैसे दिले नाहीत तर मुलांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही, शिक्षिकेच्या छळामुळे विद्यार्थ्यांनी उचलला टोकाचा पाऊल

काय घडलं नेमकं?

चेतन दिलीप जंगले असे पीडित तरुणाचे नाव आहे. चेतनने आपल्याच समाजातील धनश्री पाटील या तरुणीशी नाशिक पंचवटी येथे जाऊन प्रेम विवाह केला होता. मात्र हा विवाह मुलीच्या माहेरच्या लोकांना मान्य नव्हता. लग्नानंतर चेतन हा धनश्री सोबत त्याच्या नातेवाईकांकडे आल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना मिळाली. त्यांनी खडका गावात जाऊन चेतन जंगले सह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी त्याला नग्न करून गावात धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर नग्न करून खांबाला बांधून मारहाण केली. बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावर गावातील काही जणांनी मध्यस्थी करून त्याची सुटका केली. त्यामुळे अनर्थ टळला.

तरुणाचा हात फॅक्चर

त्याच्या आई-वडिलांनाही घर जाळण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेत तरुणाला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा हात फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने मारहाण करणाऱ्या दहा बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

१९ मार्च रोजी लग्न

चेतन आणि धनश्रीने नाशिक येथे १८ मार्च २०२६ रोजी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर १९ मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली आणि दोघे जण तरुणाच्या मामाच्या घरी मुक्कामी होते. २० मार्च रोजी तरुणीचे नातेवाइक व इतर १० ते १२ जणांनी तरुणाच्या मामाच्या घरी जाऊन तरुणीला मारहाण करत पळवून नेले. त्यांनतर मारहाणीची घटना घडली.

Mumbai Crime: दारू पिण्यावरून वाद, पतीच्या बेदम मारहाणीत 29 वर्षीय पत्नीचा मृत्यू; फरार पतीला अटक

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात ही घटना घडली.

  • Que: मारहाणीचे कारण काय होते?

    Ans: तरुणाने प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी हा हल्ला केला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: 10-12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 5 जणांना अटक करण्यात आली.

Web Title: Jalgaon crime outrage over love marriage in bhusawal youth stripped naked and beaten with iron rod across the village5 arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
1

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
2

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली
3

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.