काय घडलं नेमकं?
महेशने आपल्या पत्नी कविताची निर्घृणपणे हत्या केली. तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, त्यात ती गंभीर जखमी झाली. नंतर कविताला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वेळेवर उपचार न झाल्याने तिची प्रकृती खालावली. शवविच्छेदनातून समोर आले की, कवितावर अत्यंत गंभीर शारीरिक हल्ला झाला होता. तिच्या शरीरावर अनेक काळे-निळे डाग होते.
Buldhana Crime: संतापजनक! ७० वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर केली अत्याचार; आरोपी अटकेत
कविताचा भाऊ शुभम रमेश लोधी याने महेशविरुद्ध तक्रार दाखल केली. वडाळा पोलिसांनी आरोपी महेशविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम (१०३) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला. हत्येननंतर महेश हा फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याच मार्ग काढत त्याला अटक केली.
“आत्महत्या कर, नाहीतर नोकरी घालवू” – धमकीनंतर पोलीस कर्मचाऱ्याचे टोकाचे पाऊल; नेमकं प्रकरण काय?
मुंबई: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय पोलीस शिपायाने प्रेयसीच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जीव दे, नाहीतर तुझी नोकरी घालवू, अशी धमकी प्रेयसीच्या आईने दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
भैयासाब भीमराव व्हावळे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. भैयासाब यांची नुकतीच ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई पोलीस दलात चालक पदावर नियुक्ती झाली होती. ते कलिना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आपले प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करत होते. मात्र १५ मार्च रोजी सकाळी त्यांनी प्रशिक्षण केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट सापडली.
सुसाईड नोट मध्ये काय?
या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात भैयासाब यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत त्यांनी आपल्या मृर्तीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे स्पष्टपणे लिहिली आहेत. प्रेयसीच्या वडिलांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, तर तिच्या आईने “आत्महत्या कर, नाहीतर तुझी नोकरी घालवू” अशी धमकी दिली होती. या सगळ्या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
Ans: मुंबईतील वडाळा परिसरात ही घटना घडली.
Ans: कविता महेश वाड (वय 29).
Ans: आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.






