crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
जळगावमधून एक सायबर फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीला गुगलवर नंबर शोधणं एवढं महागात पडलं आहे की तब्बल ४ लाख ६५ हजार रुपयांचा गंडा बसला घरगुती वॉशिंग मशीन खराब झाल्याने कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधत असताना गुगलवर सर्च केलेल्या नंबरवर कॉल केल्यावर मोबाईल हॅक झाला. आणि फसवणूक झाली. हे सर्व फसवणूक कॉल दरम्यान आलेल्या ओटीपीमुळे ऑटोमॅटिक डाउनलोड झालेल्या APK फाईलमुळे घडले. पीडित निलेश सराफ यांनी तात्काळ सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून तपास सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
जळगाव शहरातील रहिवासी निलेश सराफ यांच्या घरातील वॉशिंग मशीन अचानक बंद पडली.दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी गुगलवर वॉशिंग मशीन कस्टमर केअरचा नंबर शोधला. यावेळी सापडलेल्या एका नंबरवर त्यांनी कॉल केला. कॉल दरम्यान, सराफ यांच्या मोबाईलवर एक ओटीपी (वन टाईम पासवर्ड) आले. याचवेळी त्यांच्या मोबाईलमध्ये एक APK फाईल (अँड्रॉइड पॅकेज किट) ऑटोमॅटिक डाउनलोड होऊ लागली.
सराफ यांना याची कल्पना नसताना ही फाईल इंस्टॉल होऊन गेली आणि त्यांचा मोबाईल हॅक झाला. हॅकर्सनी त्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश करून विविध व्यवहार केले. केवळ काही तासांतच त्यांच्या खात्यातून ४ लाख ६५ हजार रुपये उडवले गेले. यात दोन बँक खात्यांमधील बचत रक्कम आणि एका क्रेडिट कार्डमधील मर्यादा यांचा समावेश आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
प्रेमाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण; संतापलेल्या टोळक्याने दुचाकीला लावली आग
जळगाव शहरातून एक सांतापजनक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. तसेच त्या तरुणाची दुचाकी देखील पेटवून दिली आहे. भुसावळ तालुक्यातील एक तरुण आपल्या मैत्रिणीसोबत मोहाडी रोडवरील एका दुकानाजवळ थांबला असतांना काही तरुणांनी विचारपूस केली. त्यानंतर या टोळक्याने संबंधित तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याची दुचाकी पेटवून दिली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दखल
या घटनेतील जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.