crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पती- पत्नीच्या वादात मध्यस्थी करणं पत्नीच्या मामाला जीवावर बेतलं आहे. पत्नीच्या मामाला पतीने चाकूने वार करत खून केला आहे. या हल्ल्यात सासरे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव समद शेख असे आहे. तर आरोपीचे नाव सुभान शेख असे आहे. मृतक हे पत्नी सईदा शेख यांचे मामा होते. गेल्या काही दिवसांपासून सुभान आणि सईदा यांच्यात वारंवार वाद सुरू होता. दोन दिवसांपूर्वी पत्नी सईदा घर सोडून माहेरी गेल्यानंतर हा वाद वाढला. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये सलोखा साधण्यासाठी शुक्रवारी (दि. 12 सप्टेंबर) रात्री नातेवाईकांची बैठक बोलावण्यात आली होती.
बैठकीदरम्यान वाद संपण्याऐवजी चालत होता आणि अचानक सुभान शेख याने चाकू काढून समद शेख यांच्यावर छाती, मान आणि पोटावर सपासप वार केले. याच दरम्यान, समद शेख यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे सासरे जमील शेख यांच्यावरही हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात समद शेख गंभीर जखमी होऊन जागीच त्यांची मृत्यू झाली. तर जमीन शेख यांना तात्काळ भुसावळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सुभान शेख याला अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. या प्रकारामुळे भुसावळ शहरात भीतीच वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकारचा तीव्र निषेध केला असून, पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अवघ्या ४ महिन्यात २३ वर्षीय मयुरीने संपले आयुष्य
जळगाव मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सासरच्यांकडून हुंड्यापायी होणाऱ्या छळाला कंटाळून एका २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या विवाहितेची नाव मयुरी गौरव ठोसर (वय 23) असे आहे. अवघ्या ४ महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. तिचा ९ सप्टेंबरला वाढदिवस होता. त्याच्याच दुसऱ्या दिवशी १० सेप्टेंबरला कोणीही घरात नसतांना मयुरीने गळफास घेत जीवन संपवलं. आतापर्यंत १० लाख रुपये माहेरच्यांनी मयुरीच्या सासरच्यांना दिल्याचे समोर आले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Thane Crime: गणपती दर्शनासाठी गुजरातला गेलेला तरुण ठरला अपहरणाचा बळी; पाच दिवसांचा थरार संपला