Thane Crime: गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेलेल्या एका अल्पवयीन तरुणाला महागात पडलं आहे. पीडित अल्पवयीन मुलगा हा गणपती बघण्यासाठी गुजरातला गेला होता. तेव्हा त्याचा अपहरण झाला. अपहरकर्त्यांनी त्याच्या आईला फोन करून १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. बदलापूर ग्रामीण पोलिसांनी त्याची सुटका आलेली असून तीन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. ही घटना तब्बल पाच दिवसांच्या थरारानंतर उघडकीस आली.
Beed Crime : अंबाजोगाईत पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
नेमकं काय घडलं?
डोंबिवलीहून वांगणीत वास्तव्यास आलेल्या महिलेचा मुलगा 1 सप्टेंबर रोजी गणपती दर्शनासाठी गुजरातला गेला होता. या दरम्यान तीन जणांनी त्याचे अपहरण करून त्याच्या आईकडे तब्बल १२ लाख रुपयांची खंडणी मागितीली. महिलेने तात्काळ बदलापूर ग्रामीण पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मोबाईल सीसीआरच्या आधारे आरोपींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. गुजरात पोलिसांच्या सहकार्याने बदलापूर पोलिसांची टीम त्या ठिकाणी रवाना झाली. पोलिसांनी तपासात तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींची ओळख अनिल खैर, नरेश खैर आणि लक्ष्मण खैर अशी झाली. यातील अनिल आणि नरेश हे सख्खे भाऊ असल्याचे तपासात समोर आले.
आरोपीने मुलाला सोडून दिल्याचे सांगत होते, मात्र त्यांनी मोबाईल सिमकार्ड बदलल्यामुळे मुलाचा शोध घेणे कठीण झाले होते. परंतु पोलिसांनी IMEI या नंबरच्या मदतीने मुलाला ठावठिकाणा शोधून त्याला सुरक्षितरीत्या आईच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कारभारामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
भिवंडीच्या खाडीत महिलेचे सापडले शीर, पोलिसांनी ४८ तासात आरोपीला केली अटक
30 ऑगस्टला भिवंडी शहरातील खाडी लगतच्या ईदगाह झोपडपट्टी जवळील दलदलीत एका महिलेचे शीर आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी २४ तासात महिलेची ओळख पटवली असून ४८ तासात हत्या करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. ज्या महिलेचा शीर सापडला त्या मृत महिलेचे नाव परवीन उर्फ मुस्कान वय 26 असे आहे. तिची निर्घृण हत्या दुसरं तिसरं कोणी नसून तिचा पती आहे. या गुन्हयात पती तहा इम्तियाज अन्सारी याला अटक केली आहे.
हत्या करण्याचे कारण काय?
पती पत्नीमध्ये नेहमी वैयक्तिक संशयावरून वाद होत असतात. कधीकधी हाणामारी सुद्धा होत असते. २८ ऑगस्ट रोजी मृत महिला परवीन घरातून निघून गेली होती. त्यामुळे वाद झाला होता. त्याच रागातून पती तहा इम्तियाज अन्सारी याने २९ ऑगस्ट रोजी पत्नी परवीन हिची क्रूरपणे हत्या केली. त्यावेळी त्याने पत्नीचे शिर धडापासून वेगळे करीत शरीराचे दोन तुकडे करीत ते खाडीत भरतीचे पाणी वाढले असताना त्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.