30 वर्षीय तरुणाची गळा आवळून हत्या, अज्ञात आरोपींचा शोध सुरू (फोटो सौजन्य-ट्विटर)
जालना शहरातील खरपुडी रोड वरील चालगे सिटी परिसरात आज (30 जुलै) सकाळच्या सुमारास एका 30 वर्षीय तरुणाची अज्ञात मारेकऱ्यांनी गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या तरुणाची हत्या का केली? याचा तपास सध्या पोलीस करत आहे. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
हे सुद्धा वाचा: धुळे जिल्ह्यात प्रथमच मिनी मोक्कातंर्गत कारवाई, 2 जणांना अटक
या तरुणाची हत्या का केली? याचा तपास सध्या पोलीस करत असल्याची माहिती या प्रसंगीघटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी व तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी भेट दिली. या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी श्वानपथक सुद्धा बोलवले होते. मात्र श्वान पथक थोड्या अंतरावर गेल्यावर अपयशी ठरले आहे.
हे सुद्धा वाचा: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई, 66 किलोचा गांजा जप्त; आरोपी अटकेत
याप्रकरणी फिर्यादी सतीश राधेश्याम राठोड रा. सुरापूर, उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम जालना एमआयडीसी परिसरात यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली आहे. हत्या झालेला तरुण व त्याचे मावसभाऊ व इतर नातेवाईक हे जालना एमआयडीसी परिसरातील एका सिमेंट बनवण्याच्या कंपनीमध्ये काम करून आपली उपजीविका भागवत होते. मात्र अचानक भीमा राठोड या तरुणाचा खून झाल्यामुळे सर्व परिवार बिखरला आहे, त्याच्या नातेवाईकांचा सध्या पोलीस शोध घेत आहे.