जळगाव : जळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठेी कारवाई करत पिकअप चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. तर त्याचबरोबर गांजा विक्री अन् गावठी कट्टा विकणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या कारवाया पोलिसांनी चोपडा पिंपळगाव हरेश्वर आणि पाचोरा येथे केल्या आहेत.
पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी पेट्रोलींग दरम्यान चोरी केलेले पिकअप वाहन पकडले. याप्रकरणी वाहनचालकाला ताब्यात घेतले असता त्याने स्वतः हा पिकअप चोरी केली असल्याची कबुली दिली. दरम्यान, सदर आरोपीला पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेत त्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी ६६ किलो गांजा जप्त करत आरोपीला अटक केली आहे.
चोपडा येथे गावठी कट्टा विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि 10 जिवंत काडतूस जप्त केली आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश रेड्डी यांनी दिली.