Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: धारदार शस्त्राच्या धाकाने दुचाकीस्वार महिलेला लुटले; ३ लाख ७० हजारांचे दागिने लंपास

Baramati Crime News: महिलेला धाक दाखवला. बांगड्या व अंगठी न दिल्यास जीवे मारू, अशी धमकी दिली.फिर्यादीने शस्त्राला घाबरून सोन्याच्या बांगड्या व अंगठी काढून दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 06, 2025 | 02:35 AM
Crime News: धारदार शस्त्राच्या धाकाने दुचाकीस्वार महिलेला लुटले; ३ लाख ७० हजारांचे दागिने लंपास

Crime News: धारदार शस्त्राच्या धाकाने दुचाकीस्वार महिलेला लुटले; ३ लाख ७० हजारांचे दागिने लंपास

Follow Us
Close
Follow Us:
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर वंजारवाडी येथील घटना
बारामतीमध्ये घडली धक्कादायक घटना
बारामती तालुका पोलिस ठाण्यात दिली गेली फिर्याद

बारामती: बारामती औद्योगिक वसाहत येथील (Baramati) कंपनीत निघालेल्या महिलेच्या दुचाकीला दुचाकी आडवी लावून ,तिला धारदार शस्त्राचा धाक दाखवत दोघांनी तिच्याकडील ३ लाख ७० हजार रुपयांचे ४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लुटून (Crime) पळ काढला. ही घटना मंगळवारी (दि. २) दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास वंजारवाडी पुलाजवळ घडली.

या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात रूपाली किशोर रुपनवर (रा. रुई, बारामती) या महिलेने फिर्याद दिली. फिर्यादी रूपनवर यांची वंजारवाडीतील जगदंबानगर परिसरात तन्वी फुटस नावाची कंपनी आहे. तिकडे त्या स्कूटीवरून निघाल्या होत्या. पालखी महामार्गावरील पुलाजवळ त्या आल्या असताना, पाठीमागून अज्ञात दोन व्यक्ती एका दुचाकीवरून आले. त्यांनी दुचाकी आडवी मारत फिर्यादीला गाडी थांबवायला भाग पाडले, पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने गाडीवरून खाली उतरत फिर्यादी महिलेच्या स्कूटीची चावी काढून घेतली.

तसेच स्कूटीच्या सीटवर धारदार शस्त्राने वार केले. महिलेला धाक दाखवला. बांगड्या व अंगठी न दिल्यास जीवे मारू, अशी धमकी दिली.फिर्यादीने शस्त्राला घाबरून सोन्याच्या बांगड्या व अंगठी काढून दिली. त्यानंतर ते पालखी महामार्गावरून पाटसच्या बाजूने सुसाट निघून गेले. या घटनेत फिर्यादीकडील ३ लाख ४२ हजार रुपये किमतीच्या ३८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व २७हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून नेण्यात आली. अधिक तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.

बारामतीतील बंटी- बबलीने अनेकांना घातला कोट्यावधींचा गंडा; इलेक्ट्रिक बाइकच्या फ्रॅंचाईजीसाठी उकळले पैसे

भर दिवसा पालखी महामार्गावर अशा प्रकारे झालेल्या प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी देखील या महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. भर दिवसा देखील असे प्रकार घडल्याने दिवसा देखील महिलांनी या महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे ठरू लागले आहे. महामार्ग पोलिसांनी दिवसा व रात्रीच्या वेळी या पालखी महामार्गावर गस्त वाढवावी, तसेच विविध ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

बारामतीतील बंटी- बबलीने अनेकांना घातला कोट्यावधींचा गंडा

बारामती शहरात बाहेरून आलेल्या एका बंटी बबली या जोडीने एका इलेक्ट्रिक बाइक कंपनीची सुरुवात करून या कंपनीची फ्रॅंचाईजी विविध भागांमध्ये देण्यासाठी प्रत्येकी १६ लाख असे कोट्यावधी रुपये गोळा करून ही जोडी सध्या गायब झाली आहे. त्यामुळे आयुष्याची पुंजी गोळा करून या जोडीकडे गुंतवणूक केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Jewelry worth rs 370 lakh robbed from a woman riding a bike at gunpoint baramati crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • baramati
  • Baramati Crime
  • crime news

संबंधित बातम्या

एसटीत गुंडगिरी, धावत्या बसमध्ये चालकाला दांडक्याने मारहाण; VIDEO व्हायरल
1

एसटीत गुंडगिरी, धावत्या बसमध्ये चालकाला दांडक्याने मारहाण; VIDEO व्हायरल

महाराष्ट्र हादरला! 55 वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार; पोलिसांनी आरोपीला…
2

महाराष्ट्र हादरला! 55 वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार; पोलिसांनी आरोपीला…

बाप नंबरी बेटा 10 नंबरी! पासपोर्ट प्रकरणात ‘या’ नेत्याला कोर्टाने सुनावली 7 वर्षांची शिक्षा
3

बाप नंबरी बेटा 10 नंबरी! पासपोर्ट प्रकरणात ‘या’ नेत्याला कोर्टाने सुनावली 7 वर्षांची शिक्षा

रेल्वे प्रवाशांवर चोरट्यांचा ‘डल्ला’! नांदेड स्टेशन गुन्हेगारीत अव्वल, भुसावळ दुसऱ्या तर छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या स्थानी
4

रेल्वे प्रवाशांवर चोरट्यांचा ‘डल्ला’! नांदेड स्टेशन गुन्हेगारीत अव्वल, भुसावळ दुसऱ्या तर छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या स्थानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.