Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Crime: जेवणावरून वाद आणि…, झारखंडमध्ये पत्नीचा साडीने गळा आवळून केली हत्या; नेमकं काय घडलं?

झारखंडच्या सिंहभूममध्ये जेवण बनवण्याच्या किरकोळ वादातून पती संजय शर्माने पत्नी निशा शर्मेची साडीने गळा आवळून हत्या केली. मृतदेह झुडपात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 11, 2025 | 02:34 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जेवण बनवण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद.
  • पतीने रागाच्या भरात साडीने गळा आवळून हत्या.
  • मृतदेह झुडपांमध्ये फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न.
झारखंड: झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मृतदेह झुडपांमध्ये फेकून दिला. मृतकाचे नाव निशा शर्मा असे आहे. तर आरोपीचं नाव संजय शर्मा असे आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?

७ डिसेंबरला संध्याकाळी संजय शर्मा आणि त्याची पत्नी निशा शर्मा यांच्यामध्ये जेवण बनवण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की, संजयने रंगाच्या भरात निशाच्या साडीने गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ती साडी जाळून टाकली आणि मृतदेह जवळच्या परिसरातील झुडुपांमध्ये फेकून दिला.

स्थानिकांना गंभीर अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळ्यास परिसरात एकच खळबळ उडाली आणि पोलिसांना सुद्धा या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यानंतर, पोलिसांनी तपासासाठी पथके तयार केली आणि तपास सुरु केला. मृत महिलेचा पती संजयवर पोलिसांना संशय आला. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीची कठोर चौकशी केली. चौकशीत संजयने गुन्हा कबूल केला. आरोपी संजयने सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांनी जाळलेल्या साडीचे तुकडे सुद्धा ताब्यात घेतले.

गुन्हा दाखल

आरोपी संजय हा मूळचा बिहारमधील शिवण जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो बऱ्याच काळापासून मुसाबनी येथे राहत होता. पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा शेवट खूनी कटात; पत्नी आणि प्रियकराकडून पतीची जंगलात हत्या

झारखंड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी अपहरण केलं, नंतर जंगलात नेले आणि तिथे निर्दयीपणे हत्या करण्यात आली. मृतकाचे नाव संजू भारती (35) असे आहे. ही घटना झारखंडच्या चितरा गावात २२ नोव्हेंबर रोजी घडली.

काय घडलं नेमकं?

आरोपी पत्नीचं नाव रीता कुमारी आणि तिचा प्रियकर अरविंद भारती यांनी पती संजू याचा काटा काढण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी आधी अपहरण केलं त्यानंतर त्याला जंगलात नेऊन त्याची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी मृतकाच्या भावाने म्हणजेच संजयने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संजयने मृतकाचे पत्नी रीता कुमारी आणि तिचा प्रियकर अरविंद भारती यांनी मिळून संजूची हत्या केल्याचे स्पष्ट आरोप केले. त्याने हत्येचा घटनाक्रम सांगितला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पीडित संजूचा शोध घेण्यास सुरुवात केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पत्नीची हत्या कोणत्या कारणावरून झाली?

    Ans: जेवण बनवण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात पतीने हत्या केली.

  • Que: आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी काय केलं?

    Ans: त्याने हत्या केलेली साडी जाळली आणि मृतदेह झुडपात फेकला.

  • Que: आरोपीला कसा पकडण्यात आलं?

    Ans: तपासादरम्यान संशय आल्याने पोलिसांनी चौकशी केली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Jharkhand crime husband strangles wife to death with a saree in jharkhand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • crime
  • Jharkhand
  • Jharkhand Crime

संबंधित बातम्या

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
1

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल
2

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई
3

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील
4

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.