Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

KDMC Crime: कल्याणजवळील बल्याणी परिसरात एका कारची तपासणी करताना दोन गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत रोशन गोंधळी आणि त्याचा साथीदार कृष्णा यादव या दोघांना अटक केली. दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 19, 2026 | 06:33 PM
घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Follow Us
Follow Us:
  • कल्याण नजीक कल्याणी मध्ये कारमधून दोन पिस्तूल 10 जिवंत काडतुस सापडल्याने परिसरात खळबळ
  • बल्यानी परिसरात दहशत माजवणाऱ्या रोशन गोंधळीसह दोघांना अटक
  • घातपात करण्यासाठी वापरली जाणार होती का पिस्तूल पोलीस तपास सुरू ?
KDMC Crime: कल्याणजवळील बल्याणी परिसरात एका कारमधून दोन गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने केलेल्या कारवाईत रोशन गोंधळी आणि त्याचा साथीदार कृष्णा यादव या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर ही शस्त्रे नेमकी कशासाठी आणण्यात आली होती, याचा तपास सुरू झाला आहे. संभाव्य घातपात किंवा अन्य कोणता गुन्हा करण्यासाठी ही शस्त्रे वापरली जाणार होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

ठाणे LCBचे पोलीस अधिकारी भाऊसाहेब गायकवाड यांना बल्याणी परिसरात रोशन गोंधळीच्या कारमध्ये शस्त्रे असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित कारवर लक्ष ठेवून तिची तपासणी केली. कारची झडती घेतली असता पोलिसांना दोन गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे आढळून आली. त्यानंतर रोशन गोंधळी आणि कृष्णा यादव या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

तलावाभोवतीची अतिक्रमणे हटवा; प्रभावशाली व्यक्तींचीही गय करू नका, हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश

टिटवाळा पोलिसांकडे तपास

गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी टिटवाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. टिटवाळा पोलिसांनी दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत आरोपींकडून शस्त्रांबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पिस्तूल कोणाकडून मिळाली?

पोलिसांसमोर आता अनेक प्रश्न आहेत. ही पिस्तूल आणि काडतुसे आरोपींनी कोणाकडून खरेदी केली? ती नेमकी कशासाठी आणली होती? कोणत्या गुन्ह्यासाठी त्यांचा वापर होणार होता? तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे. टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विशाल चोरगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

रोशन गोंधळीविरोधात यापूर्वीही गुन्हे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन गोंधळी याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही तपास केला जात आहे. बल्याणी परिसरातून एकाच कारमध्ये दोन गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे सापडल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मात्र, शस्त्रे नेमकी कोणत्या उद्देशाने आणली होती, हे पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास टिटवाला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विशाल चोरगे करीत आहेत.

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Web Title: Kalyan balyaani car two country made pistols 10 live cartridges roshan gondhali arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • police

संबंधित बातम्या

KDMC News: वाहतूक कोंडी सुटणार, शेतकऱ्यांचा मोबदला मिळणार; कल्याण-शीळ तिसऱ्या लेनचा मार्ग मोकळा
1

KDMC News: वाहतूक कोंडी सुटणार, शेतकऱ्यांचा मोबदला मिळणार; कल्याण-शीळ तिसऱ्या लेनचा मार्ग मोकळा

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
2

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
3

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक
4

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.