Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News: वाहतूक कोंडी सुटणार, शेतकऱ्यांचा मोबदला मिळणार; कल्याण-शीळ तिसऱ्या लेनचा मार्ग मोकळा

KDMC News: कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित तिसऱ्या लेनच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या जवळपास ५०० शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत मोबदला देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील १३८.४५ कोटी रुपयांचा निधी लवकरच वितरित होणार असून, त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील मोबदला देण्यात य

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 19, 2026 | 04:19 PM
वाहतूक कोंडी सुटणार, शेतकऱ्यांचा मोबदला मिळणार; कल्याण-शीळ तिसऱ्या लेनचा मार्ग मोकळा

वाहतूक कोंडी सुटणार, शेतकऱ्यांचा मोबदला मिळणार; कल्याण-शीळ तिसऱ्या लेनचा मार्ग मोकळा

Follow Us
Follow Us:
  • कल्याण-शीळ मार्गावरील तिसऱ्या लेनचा मार्ग मोकळा
  • ५०० शेतकऱ्यांना मोठा दिलासा
  • १३८.४५ कोटींचा निधी लवकरच मिळणार
KDMC News: कल्याण-शीळ मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रस्तावित करण्यात आलेल्या तिसऱ्या लेनच्या कामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादनामुळे बाधित होणाऱ्या जवळपास ५०० शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांकडून योग्य मोबदल्याची मागणी करण्यात येत होती.

तीन टप्प्यांत मिळणार मोबदला

बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. यापैकी एका टप्प्याचा निधी यापूर्वीच वितरित करण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील तब्बल १३८.४५ कोटी रुपयांचा निधी लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील मोबदला देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

KDMC News: शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेरील टेस्ट मात्र निगेटिव्ह

खासदार श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार

बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा आणि तिसऱ्या लेनच्या प्रकल्पातील अडथळे दूर व्हावेत, यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने पाठपुरावा करण्यात आला. तसेच शिवसेना आमदार राजेश मोरे आणि मनसे नेते व माजी आमदार राजू पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले.

वाहतूक कोंडीला मिळणार दिलासा

कल्याण-शीळ मार्ग हा डोंबिवली, कल्याण आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते आणि वाहनचालकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. तिसऱ्या लेनचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गाची वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होणार असून, कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांनी मानले आभार

मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या निर्णयानंतर बाधित शेतकऱ्यांनी डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेत एकत्र येत आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी आमदार राजेश मोरे, माजी आमदार राजू पाटील, खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न सुटल्याने तिसऱ्या लेनच्या कामातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला असून, आता प्रकल्पाच्या पुढील कामांना वेग येण्याची शक्यता आहे.

KDMC Politics: महायुतीत पुन्हा धुसफूस! शेकडो शिंदे शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश; कल्याण-डोंबिवलीत राजकीय संघर्षाला नवे वळण

Web Title: Kalyan shil road third lane compensation 500 farmers shrikant shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • kalyan
  • KDMC
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा
1

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा

KDMC News: डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग, कर्मचारीही गायब! उपायुक्तांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये सुमित एलकोच्या कामाची पोलखोल
2

KDMC News: डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग, कर्मचारीही गायब! उपायुक्तांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये सुमित एलकोच्या कामाची पोलखोल

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
3

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन
4

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.