Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Washim crime: वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी येथील मोर्णा तलावात प्रेमीयुगलाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने दोघांनी मोर्णा तलावात उडी घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 19, 2026 | 01:39 PM
अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, मात्र लग्नाला विरोध; आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत जीवन संपवलं

अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, मात्र लग्नाला विरोध; आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत जीवन संपवलं

Follow Us
Follow Us:
  • आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध
  • प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत जीवन संपवलं
  • लग्नाला विरोध झाल्याने दोघांनी तलावात घेतली उडी
Washim crime: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. गोकासावंगी शिवार येथील ऊर्ध्व मोर्ना तलावात तरुण आणि तरुणीचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांची ओळख गोकासावंगी गावचे रहिवासी असलेले २६ वर्षीय महादेव निंबाळकर आणि १९ वर्षीय निकिता कांबळे अशी पटली आहे. हे दोघे ही १४ ऑगस्टपासून बेपत्ता होते.

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव आणि निकिता १४ ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाले. बराच वेळ घरी परत न आल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. कुटुंबातील सदस्यांनी आणि ओळखीच्या लोकांनी आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेतला, पण त्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. यानंतर, कुटुंबाने १५ ऑगस्ट रोजी मालेगाव पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.मात्र मिळालेल्या माहितीनुसार आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध केला म्हणून प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत जीवन संपवलं

Delhi Crime: अवघे पाऊणशे वयोमान! डेटिंग App वरून 67 वर्षाच्या पुरुषाशी केली महिलेे मैत्री, डिनर डेटवर गेली अन्…

मासेमारी करणारे तरुण

दरम्यान, गोकासावंगी शिवार येथील अप्पर मोरना तलावात मासेमारीसाठी गेले होते. त्यांना पाण्यात दोन मृतदेह तरंगताना दिसले. मृतदेह पाहून उपस्थित लोकांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तलावातून मृतदेह बाहेर काढले. त्यांची ओळख महादेव निंबाळकर आणि निकिता कांबळे अशी पटली.

आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, महादेव आणि निकीता यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याची इच्छा आपल्या कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. मात्र, दोघे वेगवेगळ्या जातीतील असल्याने त्यांच्या आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांचा विरोध होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. दोघांनी कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, घरच्यांकडून लग्नाला परवानगी मिळत नसल्याने दोघे नैराश्यात गेले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

आत्महत्या की अन्य काही कारण?

दोघांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असला, तरी मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आणि तपासातील इतर बाबी समोर आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, घटनाक्रमाची माहिती घेण्यासाठी कुटुंबीय आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे.

खोट्या प्रतिष्ठेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेमुळे आंतरजातीय विवाहाला होणारा विरोध आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दबावाचा गंभीर मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दोन व्यक्तींनी आपल्या पसंतीने विवाह करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कुटुंबीय किंवा समाजाकडून होणारा विरोध त्यांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम करू शकतो. मात्र, या प्रकरणात नेमके कोणते कारण निर्णायक ठरले, हे पोलिसांच्या सविस्तर तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Junnar Crime News: जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून हत्या; संशयित ताब्यात

Web Title: Washim malegaon gokasawangi morna lake couple death inter caste marriage opposition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • crime
  • police
  • Washim

संबंधित बातम्या

Washim: वाहन कायद्याची अंमलबजावणी करा, आरटीओ रवींद्र भुयार यांच्या सूचना; कार्यालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा
1

Washim: वाहन कायद्याची अंमलबजावणी करा, आरटीओ रवींद्र भुयार यांच्या सूचना; कार्यालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

Kalyan Redevelopment Project: पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
2

Kalyan Redevelopment Project: पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
3

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.