crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
कल्याण: कल्याण येथुन एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर मैत्री करणं चांगलाच भोवलं आहे. अल्पवयीन मुलीसोबत इंस्टाग्रामवर मैत्री करून ७ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कदायक बाब समोर आली आहे. एवढंच नाही तर या नराधम आरोपींनी तिच्यासोबत संबंध प्रस्तापित करून तिचा व्हिडीओ तयार केला आणि तो आपल्या मित्रतांना पाठवला. तिला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ५ महिने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजार केले आहे. कल्याण न्यायालयाने सातही जणांना 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन विद्यार्थींनीवर अत्याचार करणारे हे नराधम धनाढ्य कुटुंबातील असल्याची माहिती आहे. पीडित मुलगी ही आपल्या आईसोबत राहते. ही घटना कल्याण येथे घडली.
नेमकं काय घडलं?
१७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. ही मुलगी ५ महिन्यांपासून आधीच मानसिक तणावाखाली होती. जेव्हा तिला कुटुंबीय विचारत होते की काय झाले, तेव्हा ती घरच्या मंडळींना काही सांगतही नव्हती. मात्र, तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सत्य समोर आलं आहे.
या मुलीसोबत एप्रिल महिन्यात राहुल भोईर नावाच्या तरुणाने इंस्टाग्रामवर मैत्री केली. या मैत्रीतून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर, मुलीसोबत लैगिंक अत्याचार केला, त्याचा व्हिडीओही तयार केला. तो व्हीडीओ राहुलने दुसरा तरुण देवा पाटील याला पाठविला. देवा पाटीलने त्या मुलीस व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. देवानंतर अजित सुरवसे, गौरव सुरवसे, हर्षल पोळसे, जयेश मोरे आणि किरण सुरवसे यांना हा व्हिडीओ पाठविण्यात आला. त्यानंतर, या सर्वांनी तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली.
८ दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे आरोपी मुरबाड आणि भिवंडी परिसरातील रहिवासी आहे. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. या सातही आरोपींना कल्याणच्या पोक्सो विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी, न्यायालयाने सातही आरोपींना 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Mumbai Crime: कांदिवली हादरलं! ज्येष्ठ व्यावसायिकाचा सुपारी देऊन खून; मुलगाच ठरला कटात सहभागी