मुंबई: मुंबईतून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत तक्षशिला परिसरात डबल मर्डर झाल्याची घटना समोर आली आहे. मुलानेच आपल्या वडील आणि आजोबाची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्यारा हा फक्त २३ वर्षाचा आहे. त्याने चाकूने वार करत हत्या केली. या हल्ल्यात त्याचा काका जखमी झाला आहे.
Crime News: AI चा असाही गैरवापर! तरूणीला थेट फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्याची धमकी दिली अन्…
नेमकं काय घडलं?
रात्री दारू पियुन वडील पैसे आणि शिवीगाळ करत होते. तेव्हा मुलाने ५२ वर्षीय वडिलांची हत्या केली. त्यानंतर ७५ वर्षीय आजोबा वर वार केले. ४५ वर्षीय काका भांडण सोडवायला गेले तेव्हा त्यांच्यावर देखील मुलाने चाकूने हल्ला केला. मुलाचा या हल्ल्यात काकासुद्धा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहे.
स्वतः केले आत्मसमर्पण
रात्री दोनच्या सुमारास मुलाचे वडील आणि आजोबा दारू पिऊन धिंगाणा घालत होते. याच्याच राग धरून मुलाने धारदार चाकूने दोघांची हत्या केली. हत्येनंतर मुलाने एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये चाकू घेऊन आत्मसमर्पण केले. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवले. तर हत्या करणारा मुलाच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
कांदिवली हादरलं! ज्येष्ठ व्यावसायिकाचा सुपारी देऊन खून
दरम्यान, कांदिवलीमधून देखील हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्येष्ठ व्यावसायिकाच्या हत्येचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहेत. या कटात व्यावसायिकाच्या मुलाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यावसायिकाचा नाव ६७ वर्षीय मोहम्मद आयुब मोहम्मद युनूस सय्यद असे आहे. त्यांची हत्या त्यांच्या कार्यालयामध्ये धारदार शास्त्राने वार करून करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून मुलगा हा फरार आहे.
का आणि कशी करण्यात आली हत्या?
तपासातून समोर आले की, मृतक व्यावसायिकाचा भागीदार शानू मुस्ताक चौधरी याला गुंतवणुकीचा हिस्सा परत मिळत नसल्याचा राग होता. याशिवाय, मृतकाचा मुलगा मोहम्मद हनिफ सय्यद याला मालमत्तेत हिस्सा न दिल्याने त्यानेही या कटात सहभाग घेतला आहे.
मृतकाचा मुलगा आणि भागीदार या दोघांनी मिळून हत्येची सुपारी दिली आणि हत्येचा कट रचला. त्यांनी गोवंडीतील मोहम्मद खैरूल इस्लाम कादीर अली आणि त्याचा साथीदार शहानवाज जमिल कुरेशी यांना सुपारी दिली. या हत्येसाठी तब्बल 6.50 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. यापैकी 1 लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.पोलिसांनी आतापर्यंत तिघा आरोपींना अटक केली असून चौथा आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. या हत्येमुळे व्यावसायिक जगतात खळबळ उडाली आहे.