Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत; 24 तास बाथरूमचा नळ सुरू… अन् ‘त्या’ एका व्हॉईस मेलने पोलिसही चक्रावले!

कल्याणच्या नीलकंठ सोसायटीत प्रियकराची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरल्याचा आरोप एका महिलेवर आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने तब्बल 24 तास बाथरूमचा नळ सुरू ठेवल्याचा संशय आहे. मात्र, आरोपीने पाठवलेल्या एका व्हॉईस मेलमुळे संपूर्ण कट उघड झाला. आरोपी महिला फरार असून पोलिसांची पथके कोलकात्यात तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 20, 2026 | 11:40 AM
धक्कादायक ! वाढदिवशीच सासरच्या मंडळींनी केली जावयाची हत्या; बॅटसह काठीने केला हल्ला

धक्कादायक ! वाढदिवशीच सासरच्या मंडळींनी केली जावयाची हत्या; बॅटसह काठीने केला हल्ला

Follow Us
Follow Us:
  • प्रियकराची हत्या करून मृतदेह गोणीत भरून बाथरूममध्ये लपवण्यात आल्याचा आरोप.
  • पुरावे नष्ट करण्यासाठी 24 तास बाथरूमचा नळ सुरू ठेवल्याचा पोलिसांचा संशय.
  • आरोपीच्या व्हॉईस मेलमुळे प्रकरण उघडकीस; महिला फरार असून कोलकात्यात शोध सुरू.
कल्याण: कल्याण येथून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. बंद फ्लॅट… बाथरूममध्ये अखंड सुरू असलेला नळ… घरातून येणारी असह्य दुर्गंधी… आणि त्यानंतर आलेला एक व्हॉईस मेल. या एका संदेशाने पोलिसांसह संपूर्ण परिसर हादरला. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा बाथरूममध्ये गोणीत भरलेला एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. प्रियकराचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी महिलेने तब्बल 24 तास बाथरूमचा नळ सुरू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला असून, या हायप्रोफाइल मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

काय घडलं नेमकं?

कल्याणच्या मलंग रोड परिसरातील काकाचा ढाबा येथील नीलकंठ सोसायटीत ही घटना घडली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या सोसायटीतील एका बंद घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा घर बाहेरून लॉक होते. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात सगळीकडे शांतता होती, पण बाथरूमच्या दिशेने जाताच पोलिसांना संशयास्पद गोणी आढळून आली. ती गोणी उघडली असता, पोलिसांना आत सडलेल्या अवस्थेत एका पुरुषाची ‘डेड बॉडी’ आढळली. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले.

Beed Crime: बीडच्या बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन? एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

२४ तास बाथरूमचा नळ सुरु

तपासात समोर आले की आरोपी महिलेने प्रियकराची हत्या डोक्यात वार करून धारधार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर मृतदेह गोणीत भरला. अत्यंत थंड डोक्याने केलेल्या या हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी महिलेने मृतदेह गोणीत भरला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने बाथरूमचा नळ २४ तास सुरु ठेवला. सोसायटीत दररोज पाणी सुटले की ते पाणी थेट गोणीवर पडत होते, ज्यामुळे मृतदेह पाण्यात भिजून लवकर सडत होता आणि रक्ताचे डागही वाहून जात होते.

व्हॉईस मेल मध्ये काय?

हत्या केल्यांनतर आरोपी महिला थेट कोलकात्याच्या दिशेने फरार झाली. मात्र पळून गेल्यानंतर तिने घरमालकाला एक व्हॉईस मेल पाठवला. या व्हाईस मेलमध्ये तिने म्हटले, “फ्लॅटमधील बाथरूमचा नळ चालू राहिला आहे आणि तिथे एक डेड बॉडी ठेवली आहे.” हा व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला असून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून ‘मोस्ट वाँटेड’ आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे. पोलिसांची विशेष पथके कोलकात्याकडे रवाना झाली आहेत. या हत्येमागील नेमके कारण आणि इतर आरोपींचा सहभाग याचा तपास सध्या सुरू आहे.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा कहर! टेम्पोच्या धडकेनंतर कार पेटली, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कुठे आढळून आला?

    Ans: कल्याणमधील नीलकंठ सोसायटीतील फ्लॅटच्या बाथरूममध्ये गोणीत.

  • Que: पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने काय केल्याचा संशय आहे?

    Ans: बाथरूमचा नळ 24 तास सुरू ठेवला.

  • Que: प्रकरणाचा उलगडा कशामुळे झाला?

    Ans: आरोपीने घरमालकाला पाठवलेल्या व्हॉईस मेलमुळे.

Web Title: Kalyan crime lover murdered and body stuffed in a sack bathroom tap left running for 24 hours and that one voice mail left the police baffled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • crime
  • Kalyan Crime
  • thane

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख
2

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ
4

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.