कसा झाला अपघात?
इथेनॉल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला, त्यामुळे दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरु असताना रात्रीच्या सुमारास समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात झाला. मालवाहू वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारने अचानक पेट घेतला आणि कारमधील चार जणांचा मृत्यू झाला तर मालवाहू वाहनातील एकाचा मृत्यू झाला. एल जण गंभीर जखमी झाले आहे.
तर अपघातानंतर समृद्धी महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तर एका बाजूची वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या अपघातानंतर समृद्धी महामार्ग आणि त्यावरील अपघात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नवविवाहितेवर काळाचा घाला; धुळ्याजवळ भीषण अपघातात नाशिकच्या दोघांचा मृत्यू
राजस्थानमधील अजमेर शरीफ येथे दर्शन घेऊन नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या कारचा धुळे जिल्ह्यातील शिरपूर फाटा परिसरात भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी…






