Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याची खळबळ; मृत व्यक्तीला जिवंत दाखवत जमीन रजिस्टर केल्याचा आरोप; सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

कल्याणमधील उंबडे गावातील जमीन व्यवहारात मृत व्यक्तीचे बनावट घोषणापत्र तयार करून खोट्या सह्या करण्यात आल्याचा आणि मृत व्यक्तीला जिवंत असल्याचे दाखवत जमीन रजिस्टर केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 20, 2026 | 04:56 PM
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याची खळबळ; मृत व्यक्तीला जिवंत दाखवत जमीन रजिस्टर केल्याचा आरोप; सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याची खळबळ; मृत व्यक्तीला जिवंत दाखवत जमीन रजिस्टर केल्याचा आरोप; सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

Follow Us
Follow Us:
  • कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याची खळबळ
  • शिंदे सेनेचे माजी नगरसेवक सुनील वायलेसह सात जणांवर गुन्हा दाखल
  • मृत व्यक्तीला जिवंत दाखवत जमीन रजिस्टर केल्याचा आरोप
  • कल्याणमध्ये सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा
 

kalyan News Marathi : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाण्यात जमीन व्यवहाराशी संबंधित कथित फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत शिंदे सेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कल्याणच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

फिर्यादीच्या तक्रारीनुसार कल्याणच्या उंबडे गावातील जागेत मयत व्यक्तीची बनावट घोषणापत्र बनवून मयतांच्या खोट्या सह्या मारून जागेचे रजिस्टर केले आहे त्याच बरोबर मयत झालेल्या व्यक्तीची जिवंत असल्याचे घोषणा पत्र देऊन फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाण्यात जमीन व्यवहाराशी संबंधित कथित फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत शिंदे सेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कल्याणच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Ulhasnagar crime: खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना बेड्या; उल्हासनगर क्राईम ब्रँचची धडक कारवाई

फिर्यादी प्रमोद विश्वनाथ गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ८ मार्च २०२२ ते १८ जून २०२६ या कालावधीत कल्याण परिसरातील एका जमीन व्यवहारात आरोपींनी संगनमत करून बनावट कागदपत्रांचा वापर करत त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादी हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याची माहिती असतानाही त्यांच्याशी अन्यायकारक वागणूक देण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात निर्मला रविकांत वायले, अलका मनोहर वायले, सुनील राजाराम वायले, किसान नधू वायले, शिरीष ढवकी, सुनील मोहनदास हीरेचंदानी आणि जिगी लालचंदानी या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधकअधिनियमासह इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

तक्रारीमध्ये जमीन व्यवहारासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून दिशाभूल करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले असून, पोलिसांनी या आरोपांच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. संबंधित जमीन व्यवहाराची कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारीतील सर्व बाबींची सखोल छाननी करण्यात येत असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांनी दिली.

खडकपाडा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. राजकीय आणि आर्थिक हेतूने मला गुंतवले जात असल्याचे सांगत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने आरोप फेटाळले कायद्याचा दुरुपयोग होतोय असे सुनील वायले यांनी सांगितले. जयंती भोईर यांच्या कडून आम्ही जागा विकत घेतली आहे. गायकवाड कुटुंबियांशी आमचा कुठलाही व्यवहार झालेला नाही.आमची सर्व कागदपत्रे खरी असल्याचा दावा सुनील वायले यांनी केला आहे.

ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा

फिर्यादी हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याची माहिती आरोपींना असतानाही त्यांच्याशी अन्यायकारक वागणूक देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गतही गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

Kalyan Drug Case: आंबिवलीत 13 लाखांच्या MD ड्रग्ससह तस्कराला अटक; पोलिसांची मोठी कारवाई

कोणावर झाला गुन्हा दाखल?

या प्रकरणात खालील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

निर्मला रविकांत वायले

अलका मनोहर वायले

सुनील राजाराम वायले

किसान नधू वायले

शिरीष ढवकी

सुनील मोहनदास हीरेचंदानी

जिगी लालचंदानी

पोलीस तपास सुरू

खडकपाडा पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संबंधित जमीन व्यवहारातील कागदपत्रे, घोषणापत्रे, सह्या आणि नोंदणी प्रक्रियेची पडताळणी केली जात असून, या कथित फसवणुकीमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर पुढे कोणती कारवाई होते, याकडे आता कल्याणसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Kalyan land fraud case former shiv sena corporator sunil vayle and seven booked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • police

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Kalyan-Dombivli Ring Road: रिंग रोडला हिरवा कंदील; वाहतूक कोंडी सुटणार, कल्याण-डोंबिवली प्रवास होणार अवघा ६ मिनिटांचा!
4

Kalyan-Dombivli Ring Road: रिंग रोडला हिरवा कंदील; वाहतूक कोंडी सुटणार, कल्याण-डोंबिवली प्रवास होणार अवघा ६ मिनिटांचा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.