Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kanpur Crime: 4 लग्न, १२ बळी आणि ८ कोटींची फसवणूक; पोलीस, डॉक्टर, बँक मॅनेजरही फसले! ‘हनीट्रॅप’ चं भंडाफोड

कानपूरमध्ये दिव्यांशी चौधरी नावाच्या महिलेने चार लग्न करून 12 पेक्षा अधिक पुरुषांना प्रेमजाळ्यात अडकवले. खोटे बलात्काराचे गुन्हे दाखल करून ब्लॅकमेलिंग करत 8 कोटींपेक्षा जास्त रक्कम उकळली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 19, 2025 | 11:14 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 12+ पुरुषांना प्रेमजाळ्यात फसवले.
  • खोटे बलात्कार FIR दाखल करून ब्लॅकमेलिंग.
  • 8 कोटी रुपयांचा व्यवहार 10 बँक खात्यात.
कानपुर: कानपुरमधून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या कानपुर पोलिसांनी एका लुटेरी दुल्हनला अटक केली आहे. एका महिलेने चार लग्न केली. १२ पेक्षा अधिक पुरुषांना आपल्या जाळ्यात फसवलं. ब्लॅकमेलिंग करुन कोट्यवधी रुपये उकळले. या प्रकरणात अधिकाऱ्यांपासून ते डॉक्टर तिच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. या महिलेचं नाव दिव्यांशी चौधरी आहे. पोलीस तिची चौकशी करत आहेत. हे प्रकरण कसं समोर आलं आणि कशी दिव्यांशी आपल्या जाळ्यात पीडितांना अडकवायची जाणून घ्या.

Nanded Crime: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, मित्राच्या रूमवर गेली आणि…; नेमकं प्रकरण काय?

कशी अडकवायची जाळ्यात

दिव्यांशी आधी पुरुषांशी मैत्री करायची. त्यानंतर त्यांच्यासोबत प्रेमसंबंध ठेवायची. लग्नाचं आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवते. मग, अचानक बलात्काराचा आरोप करून खोटा FIR नोंदवते. पीडित घाबरुन तोडजोडीचा फॉर्म्युला समोर ठेवतो. त्यावेळी ती त्याच्याकडून घसघशीत रक्कम वसूल करते. अशा प्रकारे तिने पोलीस, बँक अधिकारी, डॉक्टर आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवलय.

कसा आला प्रकरण समोर

दिव्यांशीने कानपूरचे पोलीस कमिश्नर अखिल कुमार यांच्याकडे पोलीस अधिकारी आदित्य लोचन याची तक्रार केली. त्या तक्रारीत तिने आदित्यशी लग्न झाल्याचा दावा केला. तो पैसे हडपून दुसर्या महिलांशी संबंध ठेवतोय असा दिव्यांशीने आरोप केला. पोलिसांनी तपास केला, तेव्हा काही तरी भलताच समोर आलं. आदित्यने सांगितलं की, लग्न झाल्यापासून दिव्यांशी त्याला वेगवेगळ्या मार्गाने पैसे देण्यासाठी भाग पाडत होती. अनेकदा त्याला धमकवायची सुद्धा.

दिव्यांशीने याआधी सुद्धा दोन बँक मॅनेजरला अश्याच खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवलं होत. FIR नोंदवून ती तिच्या सावजाला जेलची धमकी द्यायची. मग तडजोडीच्या नावाखाली त्याच्याकडून लाखो रुपये उकळायची. तिच्या अकाऊंटमध्ये सापडलेल्या रक्कमेवरुन ती गेल्या अनेक वर्षांपासून हा खेळ खेळत असल्याचं स्पष्ट होतं. दिव्यांशीने आतापर्यंत डझनभर लोकांना फसवलय. चार लग्न केली आहेत. सध्या दिव्यांशीला कानपूर पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या सगळ्या नेटवर्कचा वेगाने तपास सुरु आहे.

८ कोटी रुपयापेक्षा अधिकचा व्यवहार

तपासात हे देखील समोर आलं की १० बँक खात्यात मागच्या काही वर्षात ८ कोटी रुपयापेक्षा अधिकचा व्यवहार झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या पैशांचा काही भाग मेरठ झोनमधील पोलीस अधिकारी, एक इंस्पेक्टर आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रान्सफर करण्यात आला. यावरुन स्पष्ट होतं की, दिव्यांशी हे सर्व एकटी करत नाही. तिच्या मागे खूप मोठी गॅंग असल्याचे समोर आले आहे.

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी महिलेचे नाव?

    Ans: दिव्यांशी

  • Que: एकूण उकळलेली रक्कम?

    Ans: 8 कोटी

  • Que: सध्या तिची काय स्थिती?

    Ans: अटक

Web Title: Kanpur crime honeytrap exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.