ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनले होते. या प्रकऱणातील आरोपीला भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यामुळे संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. एकीकडे तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरण उजेडात आणण्यासाठी विनोद गंगणेची मदत होत असल्याचा दावा राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे. तर विनोद गंगणे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असून तो जामीनावर बाहेर असल्याचा दावा ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज प्रकरणातील जामीनावर सुटलेला आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरला भाजपमध्ये (BJP) प्रवेश देण्यात आला होता. त्यावरूनही राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टिका झाली. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजश्रय देत असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहीले होते. त्यात आता पुन्हा विनोद गंगणे याला भाजपाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने निवडणूकीत तुळजापूर ड्रग्जचा मुद्द्यावरून राजकारण तापणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
पालघर जिल्ह्यातील भाजप गोटातून मोठी घडामोड समोर आली असून काशिनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला प्रदेश कार्यालयाने स्थगिती दिली आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना अधिकृत पत्र पाठवून माहिती दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी चौधरी यांचा पक्षप्रवेश तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात पूर्वी भाजपनेच काशिनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशानंतर राज्यभरातून विरोधकांकडून तीव्र टीका आणि आरोपांची मालिका सुरू झाली होती. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठींनी चौधरी यांच्या प्रवेशावर प्रदेश कार्यालयामार्फत स्थगिती लागू केली आहे.
पालघर साधू हत्याकांड (Palghar Mob Lynching Case) प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, स्थानिक स्तरावर झालेल्या काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे.






