नेमकं प्रकरण काय?
शीतल मोरे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती पांगरी परिसरात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत अभ्यासासाठी जात होती. मात्र, त्याच खोलीमध्ये शीतलचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर शीतलच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत अनेक नातेवाईक, सामाजिक संघटना आणि महिलांच्या संस्थांनी पोलिसांवर दबाव आणत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर पोलिसांनी मध्यरात्री आरोपी माधव काळे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला व त्याला अटकही केली.
नातेवाईकांचा गंभीर आरोप काय?
या प्रकरणी नातेवाईकांनी सर्वात गंभीर आरोप केला आहे. शीतलची हत्या करून तिला आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. शीतलचा स्वभाव, तिची सध्याची मानसिक अवस्था आणि अब्यासात असलेली प्रगती याचा उल्लेख करत तिने आत्महत्या करणे शक्य नसल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शीतल मोरे आणि आरोपी माधव काळे यांच्यात मैत्रीचे संबंध होते. त्या खोलीत शीतल वारंवार जात असे.
नातेवाईकांनी हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्यामुळे शीतलचा छत्रपती संभाजीनगर येथे पुन्हा पोस्टमार्टम केला जाणार आहे. दुहेरी पोस्टमार्टममुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बाबींचा अधिक स्पष्ट उलगडा होण्याची शक्यता आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शीतल मोरे आणि आरोपी माधव काळे यांच्यात मैत्रीचे संबंध होते. त्या खोलीत शीतल वारंवार जात असे. मात्र, नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाले किंवा शीतलला मानसिक त्रास दिला गेला का, याची सविस्तर चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
चॉकटेलटच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला धडा शिकवत कोर्टाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
Ans: संशयास्पद
Ans: माधव
Ans: पोस्टमार्टम






