
कराची हादरलं! १८ महिन्यांच्या चिमुकलीवर १७ वर्षांच्या मुलाकडून बलात्कार, उपचाराआधीच मृत्यू; वडिलांनी केली न्यायाची मागणी
डोक्याला विग अन् पुणे शहरात घरफोड्या; पोलिसांनी गुजरातच्या आरोपीसह चौघांना पकडले
नक्की काय घडलं?
पाकिस्तानच्या कराचीमधील कय्युमाबाद परिसरातून ही घटना समोर येत आहे. इथे आयझेल नावाची मुलगी राहत होती जिने केवळ १८ महिन्यांआधी या जगात आपले पाऊल टाकले. ऑगस्ट २०२६ मध्ये, १७ वर्षीय अब्दुल मनन खाऊ देण्याच्या बहाण्याने आयझेलला घरातून आपल्यासोबत घेऊन आला. माहितीनुसार, आरोपी अब्दुल कुटुंबाचा शेजारी आणि नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. तो नेहमीच आयझेल भेटायला यायचा, तिला खाऊ द्यायला आणि फिरायला घेऊन जायचा. घटनेच्या दिवशीही त्याने तसेच केले. तो घरी गेला आणि खाऊ घेऊन देतो असे कारण सांगत आयझेलला आपल्यासोबत घेऊन गेला.
मुलगी होती बेशुद्ध
काही वेळांनतर जेव्हा अब्दुल जेव्हा आयझेल घरी घेऊन परतला तेव्हा ती बेशुद्द अवस्थेत होती. घरच्यांना वाटले की गाढ झोपेत असेल ज्यामुळे कुणीही याकडे फारसे लक्ष दिले नाही. काही वेळानंतर जेव्हा मुलीच्या आईने जेव्हा तिला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला उलट्या होऊ लागल्या. आईने जेव्हा मुलीचे डायपर उघडून पाहिले तेव्हा ते रक्ताने माखलेले होते. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आणि त्यांनी तत्काळ मुलीला रुग्णालयात दाखल केला. रुग्णालयात मुलीवर लैंगिक अत्याचार झाले असून यात तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट केले.
वडिलांनी केली न्यायाची मागणी
लैंगिक अत्याचारानंतर मृत्यू झालेल्या एका वर्ष वयाच्या मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीसाठी न्याय मिळण्याची मागणी केली आहे. माध्यमांशी बोलताना त्या शोकाकुल वडिलांनी सांगितले की, संशयित आरोपी हा १७ वर्षांचा असून तो त्यांचा शेजारी आणि नातेवाईक आहे, त्याने मुलीला काहीतरी खाऊ (ट्रीट) देण्याच्या बहाण्याने बाहेर नेले होते. ती घरी परतली तेव्हा तिला उलट्या होत होत्या आणि तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.
आरोपीला अटक
कराची पोलिसांनी औपचारिक फौजदारी गुन्हा दाखल केला असून, संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिस सध्या घटनेचा सखोल तपास करत असून अपेक्षित पुरावे गोळा केले जात आहेत. या घटनेमुळे पाकिस्तानात संतापाची लाट उसळली असून पीडितेच्या आईने कठोर शिक्षेची मागणी करणारे एक भावनिक सार्वजनिक आवाहन केले आहे. अनेक प्रमुख पाकिस्तानी व्यक्ती आणि सेलिब्रिटींनी या घटनेचा जाहीरपणे निषेध केला आणि बाल सुरक्षेचे कायदे अधिक कडक करण्याची मागणी केली.