Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड पोलिसांची मोठी कारवाई; सापळा रचून दोघांना पकडले अन्…

कराड उपविभागीय पोलिसांच्या पथकाने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 09, 2025 | 01:48 PM
कराड पोलिसांची मोठी कारवाई; सापळा रचून दोघांना पकडले अन्...

कराड पोलिसांची मोठी कारवाई; सापळा रचून दोघांना पकडले अन्...

Follow Us
Follow Us:
  • अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणे भोवलं
  • सापळा रचून दोघांना घेतले ताब्यात
  • कराड पोलिसांच्या पथकाची कारवाई
कराड : कराड उपविभागीय पोलिसांच्या पथकाने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध कारवाई केली आहे. यामध्ये गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, मोबाईल व दुचाकी असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अल्तमश ऊर्फ मोन्या हारुण तांबोळी (वय २५, रा. पालकरवाडा मंगळवारपेठ, कराड) व ओमकार दीपक जाधव (वय २२, रा. होली फॅमिली स्कूलजवळ, विद्यानगर, सैदापूर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी कराड व मलकापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध व्यवहार व अग्निशस्त्र धारकांविरोधात विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर संध्याकाळी खात्रीशीर माहिती मिळाली की, दोन इसम सैदापूर/विद्यानगर कॅनॉल परिसरात अवैधरीत्या बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगून फिरत आहेत. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून अल्तमश ऊर्फ मोन्या हारुण तांबोळी व ओमकार दीपक जाधव या संशयितांना ताब्यात घेतले.

या कारवाईत त्यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे अग्निशस्त्र, ६०० रुपयांचे जिवंत काडतूस, १५ हजार रुपयांचा मोबाईल फोन, तसेच ७५ हजार रुपयांची दुचाकी असा एकूण १ लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस करत आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, तसेच पोलीस अंमलदार प्रविण पवार, सागर बर्गे, प्रशांत चव्हाण व मयूर देशमुख यांनी केली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी या पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Web Title: Karad police have laid a trap and arrested two people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • crime news
  • Karad Crime
  • Karad Police

संबंधित बातम्या

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!
1

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!

कामाच्या शोधात आलेल्या तरुणाची आत्महत्या; ट्रकखाली येऊन उडी मारली अन्…
2

कामाच्या शोधात आलेल्या तरुणाची आत्महत्या; ट्रकखाली येऊन उडी मारली अन्…

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…
3

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या
4

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.