Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : धर्मांतरासाठी दबाव अन्..; आमिष दाखवून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

नेरळजवळील ममदापूर येथील नामांकित 'दिलकप कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज'मध्ये शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय हिंदू विद्यार्थिनीला लग्नाचं आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 24, 2026 | 03:12 PM
Karjat News : धर्मांतरासाठी दबाव अन्..; आमिष दाखवून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार
Follow Us
Follow Us:
  • धर्मांतरासाठी दबाव अन्..;
  • आमिष दाखवून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार
कर्जत/ संतोष पेरणे : नेरळ जवळील ममदापूर येथे असलेले दिलकॅप इंजीनियरिंग कॉलेज हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी वादाच्या भवऱ्यात येत असतं. कधी शिक्षकांवर अन्याय तर कधी विद्यार्थ्यांवरती अन्याय तर कधी अनाधिकृत बांधकाम अशा कोणत्या ना कोणत्या कारणावरून हे महाविद्यालय नेहमीच चर्चेत येत असतो. याच महाविद्यालयात आता मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवरअत्याचार झाल्याची अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेरळजवळील ममदापूर येथील नामांकित ‘दिलकप कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज’मध्ये शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय हिंदू विद्यार्थिनीला लग्नाचं आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कॉलेजमधीलच विवाहित लॅब असिस्टंटने लग्नाचे खोटे आमिष दाखवून पीडितेची फसवणूक केली आणि नंतर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान पीडित तरुणी या महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. तिथेच लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत असलेला तौफिक निसार ठाणगे याने तिच्याशी ओळख वाढवली. ओळखीतून जवळीक निर्माण करून त्याने विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने तिच्यासोबत हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सात फेरे घेतल्याचे भासवून सांकेतिक विवाह केला. मात्र, तौफिक आधीपासूनच विवाहित असून त्याला चार मुले असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर, आरोपीने पीडित तरुणीवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिला बुरखा घालण्याची आणि नमाज पठण करण्याची सक्ती करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आपली फसवणूक झाल्याचे आणि ‘लव्ह ट्रॅप’मध्ये अडकल्याचे लक्षात येताच विद्यार्थिनीने पोलिसांत धाव घेतली.

आता याला काय म्हणावं? चक्क रुग्णवाहिकेतून दारू तस्करी; पोलिसांना संशय आला अन्…

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, सुरुवातीला 19 मार्च रोजी ठाणे येथील मध्यवर्ती रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये ‘झिरो एफआयआर’ दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा पुढील तपासासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी तौफिक ठाणगे याला नेरळ ममदापूर येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. आरोपीने यापूर्वीही इतर मुलींना अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे नेरळ परिसरात आणि महाविद्यालयीन वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच विद्यार्थिनींची अशी फसवणूक आणि शोषण होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. इतक्या गंभीर घटना घडत असून देखील प्राचार्य मात्र मूग गिळून गप्प का असा सवाल उपस्थित केला असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीने २५ लाखांना गंडा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

 

Web Title: Karjat news engineering student girl on sexual abuse tortured pressured to convert by luring her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Abused Case
  • crime news
  • karjat news

संबंधित बातम्या

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
1

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
3

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल
4

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.