Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: ‘तू मला ओळखत नाहीस… कुर्ल्यात चौकशी कर’; पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण, परिसरात दहशतीचे वातावरण

मिरा-भाईंदरमधील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्किंगच्या किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुण आणि त्याच्या आईवर चौघांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 13, 2026 | 04:14 PM
'तू मला ओळखत नाहीस... कुर्ल्यात चौकशी कर'; पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण, परिसरात दहशतीचे वातावरण

'तू मला ओळखत नाहीस... कुर्ल्यात चौकशी कर'; पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण, परिसरात दहशतीचे वातावरण

Follow Us
Follow Us:
  • काशिमीरा परिसरात पार्किंगच्या वादातून गुंडगिरी
  • तरुण व आईवर जीवघेणा हल्ला, चौघांविरोधात गुन्हा
  • धमकी देत मारहाण, परिसरात दहशतीचे वातावरण
विजय काते, मिरा रोड : काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पटेल कॉम्प्लेक्स परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाचे हिंसक रूप धारण करत 21 वर्षीय तरुण व त्याच्या आईवर चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शफात शहबाज उस्मानी (वय 21) हा 11 जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मित्रासोबत बर्गमन स्कूटरवरून फिरून आपल्या सोसायटीत परतला होता. स्कूटर पार्क करत असताना समोरील मेविश टॉवरमध्ये राहणाऱ्या सुलतान नासिर खान याने “येथे गाडी पार्क करू नको, ही जागा आमची आहे,” असे म्हणत वाद घातला. यावेळी त्याने शफातच्या कानशिलात लगावली. त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी तरुणाने शफातला ढकलून खाली पाडले. त्यानंतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी व ठोसे मारून बेदम मारहाण केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मारहाण सुरू असताना सुलतानने “मैं कौन हूं, तू जानता नहीं… कुर्ला में जाकर पूछ लेना, तेरी कुंडली निकाल दूंगा,” अशी धमकी देत दहशत निर्माण केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.

Mumbai News: ‘एका महिन्यात 50% परतावा’… या एका आमिषाने गमावले तब्बल 1 कोटी रुपये!

शफातने आरडाओरडा केल्यानंतर त्याची आई शबनम उस्मानी या मुलाला वाचवण्यासाठी घटनास्थळी धावून आल्या. मात्र त्यावेळी सुलतानचा वडील नासिर खान आणि भाऊ अल्तमश खान हेही घटनास्थळी पोहोचले. तक्रारीनुसार, चौघांनी मिळून आई-मुलाला शिवीगाळ करत मारहाण सुरूच ठेवली. सुलतानने शबनम उस्मानी यांच्या छातीवर हात लावून जोराचा धक्का दिल्याने त्या खाली कोसळल्या. या मारहाणीत त्यांच्या कानाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला तसेच ऐकण्यास त्रास सुरू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जखमींना प्रथम शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी काशिमीरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांवर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी मोहम्मद शफात उस्मानी यांच्या तक्रारीवरून काशिमीरा पोलिसांनी सुलतान नासिर खान, नासिर खान, अल्तमश खान आणि एका अनोळखी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 74, 115(2), 351(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी आरोप केला आहे की, सुलतान खान हा परिसरात दहशत निर्माण करत असून बाहेरून तरुणांना बोलावून नागरिकांना धमकावणे, शिवीगाळ करणे आणि वाद घालणे अशा घटना वारंवार घडत असतात. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

चॉकलेटच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीवर अत्याचार, दुचाकीवर बसवले अन्…; लातूरच्या उदगीरमधील संतापजनक घटना

Web Title: Kashimira parking dispute youth and mother attacked four booked bns case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • crime
  • mira bhayandar
  • police

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
1

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.