काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, मोहोसिन मुलानी यांचा मित्र अदनान इनामदार याने त्यांना ट्रेड प्रॉफिट योजनेची माहिती दिली. या योजनेत किमान 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यास अवघ्या एका महिन्यात 50 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर इनामदारने मोहोसिन यांची शुभम राजूत याच्यासोबत बोरिवली येथे भेट घडवून आणली. शुभम राजूतसह इतर आरोपींनी विश्वास संपादन करत मोठ्या परताव्याचे आश्वासन दिले.
Jalna Crime: पैशांच्या वादातून गळा आवळून हत्या; मृतदेह नदीत फेकला, डीएनए चाचणीने उघड केलं रहस्य
मोहोसिन मुलानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सफाळे येथील शुभम राजूत, तन्वेश पाटील, राजेंद्र सिंग, प्रकाश कदम, आकाश दुवे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध एल.टी. मार्ग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोख रक्कम घेताच आरोपी झाले पसार
आरोपींनी मोहोसिन मुलानी यांना मुंबईतील काळबादेवी परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ रोख रक्कम घेऊन येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे मुलानी तेथे एक कोटी रुपयांची रक्कम घेऊन पोहोचले. आरोपींनी सर्व पैसे मोजून घेतल्यानंतर पुरावा म्हणून मुलानी यांनी मागणी केली असता, त्यांनी केवळ 10 रुपयांच्या नोटेवर सही करून तीच व्यवहाराचा पुरावा असल्याचे सांगितले. तसेच एक हस्तलिखित पावतीही दिली.
काही वेळातच आरोपी तेथून पसार झाले. बराच वेळ आरोपींशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे मोहोसिन मुलानी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने एल.टी. मार्ग पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
सहा जणांविरुद्ध गुन्हा, तपास सुरू
तक्रारीच्या आधारे एल.टी. मार्ग पोलिसांनी सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नियोजनबद्ध पद्धतीने आर्थिक फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एल.टी. मार्ग पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.
Ans: तब्बल 1 कोटी रुपयांची.
Ans: एका महिन्यात 50 टक्के परतावा देण्याचे.
Ans: एल.टी. मार्ग पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.






