Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar Police Drug : वर्दीआडून काळ्याधंद्याचा उद्योग! मिरा-भाईंदरमध्ये ड्रग्ज तस्करीत पोलिस हवालदाराला रंगेहाथ बेड्या

Mira Bhayandar Police Drug : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयातील 'रक्षकच भक्षक' बनल्याचा एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला भाईंदर पूर्वेला पोलिस हवालदार प्रकाश पवार याला साथीदारासह थेट एमडी ड्रग्जची तस्करी करताना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 21, 2026 | 11:55 AM
मिरा-भाईंदरमध्ये ड्रग्ज तस्करीत पोलिस हवालदाराला रंगेहाथ बेड्या ( सौजन्य - Chatgpt )

मिरा-भाईंदरमध्ये ड्रग्ज तस्करीत पोलिस हवालदाराला रंगेहाथ बेड्या ( सौजन्य - Chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • वर्दीआडून काळ्याधंद्याचा उद्योग!
  • मिरा-भाईंदरमध्ये ड्रग्ज तस्करीत पोलिस हवालदाराला रंगेहाथ बेड्या
  • आयुक्तालय बदनाम
Mira Bhayandar Police Drug : दुसऱ्या राज्यांत जाऊन कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याचा गवगवा करणाऱ्या मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या स्वतःच्याच हद्दीत मात्र ‘दिव्याखाली अंधार’ असल्याचे संतापजनक वास्तव पुन्हा उघडे पडले आहे. नयानगरच्या प्रमोद केंद्रे याच्या ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच, आता भाईंदर पूर्वेला पोलिस हवालदार प्रकाश पवार याला त्याचा साथीदार अखिलेश कुमार याच्यासह थेट एमडी इग्जची तस्करी करताना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ( Mira Bhayandar Police Drug ) 

Palghar Leopard Alert : पालघरमध्ये बिबट्याचा वावर! नागरिकांना सतर्कतेचा इशारा, वनविभागाकडून जनजागृती मोहिम

खाकी वर्दीतले रक्षकच थेट ड्रग्ज माफियांचे भागीदार बनल्याने पोलिस दलाची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून, सामाजिक कार्यकर्ते सुशांत पवार यांनी पोलीस आयुक्तांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. तस्करी रोखता येत नसेल, तर पोलिस आयुक्तांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ निघून जावे, असा संताप पवार यांनी व्यक्त केला आहे.

साखळी बनल्याचे धक्कादायक चित्र

पोलिस आयुक्तालयातील पोलिसांचा गुन्हेगारी सहभाग आता अपवादात्मक राहिलेला नसून ती एक साखळी बनल्याचे धक्कादायक चित्र आहे. यापूर्वी नयानगर पोलिस ठाण्यातील अंमलदार प्रमोद केंद्रे याने थेट लातूरमधील स्वतःच्या शेतात एमडी ड्रग्जचा कारखाना थाटल्याचे उघडकीस आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच, आता भाईंदर पूर्वेला हवालदार प्रकाश पवार आणि त्याचा साथीदार अखिलेश कुमार यांना मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. वर्दीच्या आड चालणारा हा काळा धंदा चव्हाट्‌यावर आल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अनेक अधिकाऱ्यांचे तस्करांशी सलोख्याचे संबंध?

केवळ हवालदार पातळीवरील कर्मचारीच नव्हे, तर आयुक्तालयातील कित्येक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे ड्रग्ज तस्करांशी अतिशय घनिष्ठ व संशयास्पद संबंध असल्याची चर्चा दलात आणि शहरात उघडपणे सुरू आहे. अमली पदार्थविरोधी कारवायांचे केवळ दिखाऊ नाटक करायचे आणि आतून ड्रग्ज माफियांना अभय द्यायचे, असाच हा प्रकार असल्याचा संशय बळावला आहे. ‘रक्षकच भक्षक बनून तरुण पिढीला नशेच्या खाईत लोटत असतील, तर शहराला कोण वाचवणार?’, असा जळजळीत प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे.

प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या कष्टावर, प्रतिष्ठेवर पाणी

अशा घटनांमुळे प्रामाणिकपणे दिवस-रात्र ड्युटी करणाऱ्या हजारो पोलिसांच्या कष्टावर आणि खाकीच्या प्रतिष्ठेवर पाणी फिरत आहे. केवळ तात्पुरती चौकशी, निलंबन किंवा बदल्यांचे सोपस्कार करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या आणि तस्करांशी हातमिळवणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खाकी वर्दीत ठेवण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी सुशांत पवार यानी केली आहे.

गैरप्रकार रोखता येत नसतील तर खुर्ची सोडा

आयुक्तांनीएसी संपूर्ण आयुक्तालयाची झाडाझडती घ्यावी आणि ड्रग्ज रॅकेट मुळासकट उखडून टाकावे. जर स्वतःच्या खात्यातील तस्करी आणि भ्रष्टाचार रोखण्यात अपयश येत असेल, तर नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ निघून जावे. खात्यातील या काळ्या कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना अँटी पोलिस’ ठरवून खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचे कट रचण्याऐवजी स्वतःच्या खात्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून दाखवावी, असेही पवार यांनी म्हटले आहे.

Jawhar PWD Fake FDR : पुरावे नष्ट करण्याचा कट? जव्हार बांधकाम विभागात लाखो-कोट्यवधींचा FDR घोटाळा; बिंग फुटण्याआधीच कागदपत्रे गायब

💡

Frequently Asked Questions

  • Que: मिरा-भाईंदरमध्ये ड्रग्ज प्रकरणात कोणत्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे?

    Ans: भाईंदर पूर्वेला MD ड्रग्जची प्रत्यक्ष तस्करी करताना पोलिस हवालदार प्रकाश पवार आणि त्याचा साथीदार अखिलेश कुमार यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

  • Que: याआधी मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाशी संबंधित कोणते ड्रग्ज प्रकरण गाजले होते?

    Ans: यापूर्वी नयानगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी प्रमोद केंद्रे याने थेट लातूरमधील स्वतःच्या शेतात एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना थाटल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

  • Que: या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे कोणती मागणी केली आहे?

    Ans: सामाजिक कार्यकर्ते सुशांत पवार यांनी अशा भ्रष्ट आणि ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणाऱ्या पोलिसांना केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करावे आणि गैरप्रकार रोखता येत नसतील तर आयुक्तांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावे, अशी मागणी केली आहे.

Web Title: Mira bhayandar police constable prakash pawar arrested in md drug racket ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Action on Police
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये लोकशाही धोक्यात? आयुक्तांच्या निवासस्थानी घुसखोरीचा गंभीर आरोप!
1

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये लोकशाही धोक्यात? आयुक्तांच्या निवासस्थानी घुसखोरीचा गंभीर आरोप!

Mira Bhayandar: महासभेत हाणामारी, तरीही शेकडो कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी; भाजपच्या कारभारावर विरोधकांचा आक्षेप; नेमकं काय घडलं?
2

Mira Bhayandar: महासभेत हाणामारी, तरीही शेकडो कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी; भाजपच्या कारभारावर विरोधकांचा आक्षेप; नेमकं काय घडलं?

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप
3

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.