Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कात्रज घाटात प्रवास करताना थरार! दगडूशेठच्या दर्शनासाठी निघाले पण दाम्पत्याला अडवून तिघांनी जे केले ते…

अंगारकी चतुर्थीच्या दर्शनासाठी पहाटे दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याला जुन्या कात्रज घाटातील बोगद्याजवळ तिघांनी अडवले. जिवे मारण्याची धमकी देत महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून तिघे पसार झाले; मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे काही तासांतच पिंपरीतील तिघांना अटक केली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 01, 2026 | 08:58 AM
कात्रज घाटात प्रवास करताना थरार! दगडूशेठच्या दर्शनासाठी निघाले पण दाम्पत्याला अडवून तिघांनी जे केले ते...

कात्रज घाटात प्रवास करताना थरार! दगडूशेठच्या दर्शनासाठी निघाले पण दाम्पत्याला अडवून तिघांनी जे केले ते...

Follow Us
Follow Us:
  • अंगारकीच्या दर्शनासाठी निघालेल्या दाम्पत्याला कात्रज घाटात लुटले
  • जिवे मारण्याची धमकी देत एक लाखांचे मंगळसूत्र हिसकावले
  • काही तासांत पिंपरीतील तिघे पोलिसांच्या जाळ्यात; पुढील तपास सुरू
 

पुणे : अंगारकी चतुर्थीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या दाम्पत्याला जुन्या कात्रज घाटातील बोगद्याजवळ अडवून लुटल्याची धक्कादायक घटना घडली. पहाटेच्या अंधारात दबा धरून बसलेल्या तिघांनी दाम्पत्याला जिवे मारण्याची धमकी देत महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच तिन्ही संशयितांना अटक केली.

हेही वाचा:Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला

दर्शनाच्या ओढीने निघाले अन् घाटात अडवले

खेड शिवापूर येथे राहणारे ४६ वर्षीय तक्रारदार आणि त्यांची पत्नी मंगळवारी पहाटे दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने निघाले होते. अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी ते पुण्यात येत होते. मात्र, जुन्या कात्रज घाटातील बोगद्याजवळ आल्यानंतर त्यांचा प्रवास अचानक थांबला. पहाटेच्या निर्मनुष्य आणि अंधाऱ्या वातावरणाचा फायदा घेत तीन आरोपी दबा धरून बसले होते. त्यांनी दाम्पत्याची दुचाकी अडवली. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. सुमारे एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र घेऊन आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.

घाबरलेल्या दाम्पत्याने पोलिसांना दिली माहिती

या प्रकारामुळे दाम्पत्य घाबरले. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. काही तासांतच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. तौहिद असल शहा (२३, रा. पिंपरी), सुलेमान यासिन शेख (२१, रा. पिंपरी) आणि रोहित बबलू सिंग (२०, रा. पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा: Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

घाटात आणखी गुन्हे केले का? पोलिसांची चौकशी

अटक करण्यात आलेल्या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या टोळीने कात्रज घाट किंवा परिसरात अशाच प्रकारे आणखी काही नागरिकांना लक्ष्य केले आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. अंगारकी चतुर्थीच्या पहाटे घडलेल्या या घटनेमुळे घाट परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Katraj ghat couple robbery mangalsutra angeraki chaturthi pimpri accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • Katraj Crime
  • pune crime case
  • Robbery case
  • Robbery News

संबंधित बातम्या

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण
1

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण

केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती
2

केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय
3

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय

Pune Crime: विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; बंद घरातून ३० लाखांचे दागिने लंपास
4

Pune Crime: विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; बंद घरातून ३० लाखांचे दागिने लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.