crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
केरळ: केरळमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS वर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. बालपणापासून आतापर्यंत त्याच कसं लैंगिक शोषण झालं, या बद्दल त्याने सांगितले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणांचे नाव आनंदु अजी असे आहे. त्याचा मृतदेह तिरुवनंतपुरमच्या थंबानूर येथील एका लॉजमध्ये मिळाला. हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेसने यावरून संघावर म्हणजे RSS वर हल्लाबोल केला आहे. सोबतच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
सोशल मीडिया पोस्ट मध्ये काय?
आनंदु अजीने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय की संघामुळे त्याला नेहमी त्रास झाला आहे. पण त्यानंतरही त्याची कोणावर नाराजी नाही आहे. एनएम संघाचा एका सक्रीय सदस्य नेहमी माझं शोषण करायचा. मी जेव्हा कॅम्पमध्ये जायचो, माझं शोषण केलं जायचं. त्याशिवाय दांड्यांनी अनेकदा मारहाण सुद्धा केली. त्यानंतर त्याने असं लिहिताय RSS वाल्यांशी मैत्री करु नका. भले पिता, भाऊ किंवा मुलगा असेल तर दूर ठेवा. माझ्याकडे याचे पुरावे नाहीत. पण माझं आयुष्य याचा पुरावा आहे. बालपणाची ट्रॉमा अजूनही कायम आहे. जगातल्या कुठल्याही मुलाच्या वाट्याला असा त्रास येऊ नये, असं आनंदु अजीने लिहिलय
प्रियंका गांधी यांनी केली मागणी
अनंदु अजीच्या मृत्यूनंतर हा राजकीय मुद्दा बनला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आनंदु अजी आत्महत्या प्रकरणात आरएसएसवरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, त्याने आपल्या सुसाइड नोटमध्ये म्हटलय की, अनेकदा त्याला आरएसएस सदस्यांकडून गैरवर्तणुकीचा सामना करावा लागला.
पतीने पत्नीचा गळा चिरून केली निर्घृण हत्या, फेसबुक लाइव्हवर दिली कबुली
केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४२ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची समोर आला आहे. त्यांनतर त्याने फेसबुक लाईव्ह करत हत्येची कबुली दिली. नंतर, पोलिसांसमोर सरेंडर केल्याची माहिती समोर आली आहे. हत्या झालेल्या महिलेची नाव शालिनी असे असून ती केवळ 39 वर्षांची आहे. ती वलाकोड येथे एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. ही घटना घटना सोमवारी सकाळी जवळपास ६ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपीचं नाव ऐसेक असून त्याने आपल्या पत्नीवर हल्ला केला आहे.