Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govind Pansare: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड याचा हृदयविकाराने मृत्यू

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड यांचा सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला. ते चार वर्षांपासून जामिनावर होते. मृत्यूमुळे प्रकरणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 20, 2026 | 04:54 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड यांचा हृदयविकाराने मृत्यू
  • चार वर्षांपूर्वी जामिनावर सुटका; सांगलीत वास्तव
  • पानसरे कुटुंबीयांनी तपास एटीएसकडे वर्ग करण्याची मागणी केली होती
जेष्ठ पुरोगामी नेते कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा सांगलीतील राहत्या घरी मृत्यू झाला आहे. समीर सध्या जामिनावर होता, सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता.

याबाबत अधिक माहिती अशी, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित समीर गायकवाड, (वय ४५, रा. विकास चौक, सांगली) याचा आज दि. २० जानेवारी) सकाळी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याच्या पश्चात भाऊ आणि पत्नी आहे. त्याला प्रत्येक रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी होती. तो सांगलीतील विश्रामबाग पोलीस हजेरी देत होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली आहे.

समीर गायकवाड याला काल मध्यरात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Chhatrapati Sambhanjinagar Crime: ‘तिने मला सोडलं’ या रागातून प्रेयसीची केली हत्या, न्यायालयाने दिला कठोर निकाल

समीर गायकवाड हा गेल्या चार वर्षांपासून पानसरे हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर होता. जामीन मिळाल्यानंतर तो सांगलीतील विकास चौक परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूरमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकहून परतत असताना, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, तर त्यांची पत्नी उमाताई पानसरे देखील जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान २० फेब्रुवारी २०१५ रोजी गोविंद पानसरे यांचे निधन झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे समीर गायकवाड यासह दहा जणांना एसआयटीने अटक केली होती.

काय नेमकं प्रकरण

कॉम्रेड गोविंद पानसरे हे डाव्या चळवळीतील विचारवंत होते. त्यांची हत्या १६ फेब्रुवारी २०१५ रोजी झाली होती. कोल्हापूरमध्ये सकाळच्या सुमारास फेरफटक्यानंतर घरी परतत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात पानसरे गंभीर जखमी झाले होते. तर त्यांच्यासोबत असलेल्या उमाताई पानसरे यांनाही दुखापत झाली होती. गोविंद पानसरे यांचा उपचार सुरु असताना २० फेब्रुवारी २०१५ रोजी यांचे निधन झाले.

पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) गठीत केली. एसआयटीने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना अटक केली होती. मात्र, पानसरे कुटुंबीयांनी असमाधान व्यक्त करत एसआयटीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला. त्यांनी हा प्रकरण एटीएसकडे वर्ग करावा, अशी मागणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यावर सुनावणी करत 2022 मध्ये उच्च न्यायालयाने या हत्याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्याचे आदेश दिले होते.

यानंतर, 9 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर सत्र न्यायालयाने या प्रकरणात दहा संशयितांविरोधात हत्या आणि हत्येचा कट रचल्याचे आरोप निश्चित केले होते. या आरोपींमध्ये समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे, सचिन आंदुरे, वासुदेव सूर्यवंशी, अमित डेगवेकर, गणेश मिस्कीन, अमित बद्दी, शरद कळसकर आणि भरत कुरणे यांचा समावेश होता.

या हत्याकांडाशी संबंधित सर्व 12 संशयितांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यातून समीर गायकवाड हा देखील होता. चार वर्षांपूर्वी समीर गायकवाड हा जामिनावर बाहेर आला होता. गेली चार वर्ष तो सांगलीतील विकास चौक परिसरातील आपल्या घरी राहता होता. १९ जानेवारीला त्याला त्रास जाणवू लागला. त्याला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Beed Accident: देवदर्शनाला निघालेल्या तरुणावर काळाचा घाला; बीडमध्ये ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: समीर गायकवाड यांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: पहाटे सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

  • Que: ते कोणत्या प्रकरणातील आरोपी होते?

    Ans: 2015 मधील विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी होते.

  • Que: सध्या पानसरे हत्या प्रकरणाची स्थिती काय आहे?

    Ans: या प्रकरणातील सर्व आरोपी जामिनावर असून तपास एटीएसकडे आहे.

Web Title: Govind pansare samir gaikwad an accused in the comrade govind pansare murder case has died of a heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar : भाईंदरमध्ये अमली पदार्थविरोधी कारवाई; नायजेरियन नागरिक अटकेत, कोकेन जप्त
1

Mira-Bhayandar : भाईंदरमध्ये अमली पदार्थविरोधी कारवाई; नायजेरियन नागरिक अटकेत, कोकेन जप्त

ATS ची मोठी कारवाई! दोन दहशतवाद्यांना अटक, पाकिस्तानी गँगस्टरशी संपर्कातून टार्गेट किलिंगचा कट
2

ATS ची मोठी कारवाई! दोन दहशतवाद्यांना अटक, पाकिस्तानी गँगस्टरशी संपर्कातून टार्गेट किलिंगचा कट

Jalgaon Accident: जळगाव-जामनेर महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, 1 वर्षाची मुलगी चमत्कारिक बचावली
3

Jalgaon Accident: जळगाव-जामनेर महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, 1 वर्षाची मुलगी चमत्कारिक बचावली

Uttarpradesh Crime: थरारक घटना! 23 वर्षीय तरुणीकडून आई-भावाची निर्घृण हत्या; कारण काय?
4

Uttarpradesh Crime: थरारक घटना! 23 वर्षीय तरुणीकडून आई-भावाची निर्घृण हत्या; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.