Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kerala News: बसमधील गैरवर्तनाचा आरोप, इन्फ्लुएन्सर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल; 42 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

केरळमध्ये बसमधील गैरवर्तनाच्या आरोपाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर 42 वर्षीय दीपक यू मानसिक तणावाखाली गेला. आरोप खोटे असल्याचा कुटुंबीयांचा दावा असून, बदनामी व अपमानाच्या भावनेतून त्याने आत्महत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 21, 2026 | 08:39 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने बसमधील गैरवर्तनाचा आरोप करत व्हिडीओ केला व्हायरल
  • आरोप झालेला दीपक यू मानसिक तणावात, दोन दिवस अन्नही घेतले नाही
  • व्हिडीओ व्हायरलनंतर 42 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिस तपास सुरू
केरळ: केरळयेथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. गर्दीने तुडुंब भरलेल्या बसमध्ये एका ४२ वर्षीय तरुणाचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीला धक्का लागला, यावरून इन्फ्लुएन्सर तरुणीने गैरवर्तनाचा आरोप करत व्हिडीओ व्हायरल केला. यामुळे ४२ वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव दीपक यू असे आहे. तर व्हिडिओत आरोप करणारी इन्फ्लुएन्सरच नाव शिमजिथा मुस्तफा असे आहे. दिपकच्या कुटुंबीयांनी त्या तरुणीने केलेले आरोप खोटे असल्याचे आणि केवळ व्ह्यूज, पैश्यांसाठी व्हिडीओ बनवलं असल्याचे म्हंटल आहे.

Crime News : आम्ही इथले भाई आहोत, तुला इथून…; टोळक्याकडून तिघांना दगडाने मारहाण

काय नेमकं प्रकरण?

दीपक यू हा पुथियारा या ठिकाणी त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. तो एका गारमेंट फॅक्टरीत काम करत होता. १६ जानेवारी रोजी कामासाठी तो कन्नूरला गेला होता. तिथून तो पय्यानूर रेल्वे स्थानकातून अरिकोडला जाणाऱ्या खासगी बसने प्रवास करत होता. त्यावेळी त्याच बसमध्ये शिमजिथा मुस्तफा देखील प्रवास करत होती. ही बस त्यावेळी तुडुंब भरलेली होती. त्यावेळी दिपकचा धक्का शिमजिथा मुस्तफा हिला लागला, असे तिने आरोप केले आहे.

व्हिडीओमध्ये केलेले आरोप काय?

शिमजिथाने बसमध्ये एक १८ सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं आरोप केला होता की, दीपकने जाणीवपूर्वक तिला अश्लील स्पर्श केला आहे. असे तिने व्हिडिओमध्ये आरोप केले आहे.

दीपक मानसिक तणावाखाली गेला

शिमजिथाने जो व्हिडीओ बनवला तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला. त्यानंतर दीपक मानसिक तणावाखाली गेली होती. दोन दिवस त्याने काही खाल्लं देखील नाही. रविवारी सकाळच्या सुमारास ७ वाजता आई- वडील त्याला उठवण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेले पण त्याने दरवाजा उघडला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याच्या रूमचा दरवाजा तोडला असता दिपकने रूममध्ये गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहे. व्हायरल व्हिडिओच्या दृष्टीकोनातूनही तपास केला जात आहे.

कुटुंबीयांनी फेटाळले आरोप

या घटनेनंतर दिपकच्या कुटुंबीयांनी शिमजिथाने केले सर्व आरोप फेटाळून लावले आहे. त्याच्या वडिलांनी म्हंटल की, आमचा मुलगा निर्दोष होता. तो असं करूच शकत नाही. व्हिडीओ व्हायरल होताच अपमान झाल्याच्या भावनेनं तो अस्वस्थ झाला होता होता. व्हिडीओ पाहिल्यानंतर दीपक कोणाशीच बोलला नव्हता. त्यानं स्वत:ला खोलीत बंद करून घेतल्याचंही कुटुंबियांनी सांगितलं.त्याचं कशातही लक्ष नव्हतं, तो खातही नव्हता, याप्रकरणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू आणि न्याय मागू.

शिमजिथाने शेअर केला आणखी एक व्हिडीओ

या घटनेनंतर शिमजिथाने आणखी एक व्हिडीओ शेअर करत आपली बाजू मांडली आहे. आपण आपल्या आरोपांवर ठाम असून दीपकने जाणीवपूर्वक स्पर्श केल्याचं म्हटलंय. मात्र दीपकचा आधीचा व्हिडीओ तिने डिलिट केला आहे.

Crime News: ५ मृतदेह, ३ पिस्तुलं आणि कपाळावर गोळी! हत्या की आत्महत्या? पोलीसही चक्रावले

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे आणि कशी घडली?

    Ans: केरळमध्ये खासगी बसमधील प्रवासादरम्यान गैरवर्तनाचा आरोप झाल्यानंतर संबंधित तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • Que: आरोप कोणी केला होता?

    Ans: शिमजिथा मुस्तफा या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने बसमधील गैरवर्तनाचा आरोप करत व्हिडीओ पोस्ट केला होता.

  • Que: कुटुंबीयांची भूमिका काय आहे?

    Ans: कुटुंबीयांनी आरोप फेटाळले असून गर्दीत चुकून धक्का लागला असल्याचा दावा केला आहे आणि न्यायाची मागणी केली आहे.

Web Title: Kerala news accused of misbehaving on a bus the influencers video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • crime
  • Kerala News

संबंधित बातम्या

Ratnagiri Crime: मंडणगडमध्ये माणुसकीला काळिमा; दोन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकानेच केला अत्याचार
1

Ratnagiri Crime: मंडणगडमध्ये माणुसकीला काळिमा; दोन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकानेच केला अत्याचार

Govind Pansare: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड याचा हृदयविकाराने मृत्यू
2

Govind Pansare: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड याचा हृदयविकाराने मृत्यू

Chhatrapati Sambhanjinagar Crime: ‘तिने मला सोडलं’ या रागातून प्रेयसीची केली हत्या, न्यायालयाने दिला कठोर निकाल
3

Chhatrapati Sambhanjinagar Crime: ‘तिने मला सोडलं’ या रागातून प्रेयसीची केली हत्या, न्यायालयाने दिला कठोर निकाल

Baramati Crime: बारामती तालुक्यात निर्घृण हत्याकांड; रस्त्याच्या कडेला आढळला नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह
4

Baramati Crime: बारामती तालुक्यात निर्घृण हत्याकांड; रस्त्याच्या कडेला आढळला नग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.