५ मृतदेह, ३ पिस्तुलं आणि कपाळावर गोळी! हत्या की आत्महत्या? पोलीसही चक्रावले (Photo Credit- X)
मंगळवारी सकाळी कौशिक बिहार कॉलनीतील एका घरातून गोळीबाराचा आवाज आल्यानंतर आणि घरातून कोणाचीही हालचाल न दिसल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता त्यांना पाच जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. मृतांची ओळख अशोक राठोड (४०), त्यांची पत्नी अंजिता (३७), आई विद्यावती (७०) आणि दोन मुले कार्तिक (१६) व देव (१३) अशी झाली आहे.
प्राथमिक तपासानुसार, कुटुंबातील आई आणि दोन मुले एकाच खोलीत वेगवेगळ्या बेडवर मृतावस्थेत आढळले. अशोक राठोड यांचा मृतदेह घराच्या बाहेरील भागात (पासीघाट जवळ) सापडला, तर त्यांची पत्नी अंजिता यांचा मृतदेह घरातील दुसऱ्या भागात रक्ताच्या थारोळ्यात होता.
#SaharanpurPolice#बाईट ➡️आज दिनांक 20.01.2026 को थाना सरसावा क्षेत्रान्तर्गत कौशिक विहार कॉलोनी में एक ही परिवार के 05 लोगों के शव मिलने की सूचना पर तत्काल थाना सरसावा पुलिस द्वारा घटनास्थल पर पहुँचकर शव को कब्जे में लिया गया एवं उच्चाधिकारीण द्वारा घटनास्थल का निरीक्षण किया… pic.twitter.com/c5jltWa85l — Saharanpur Police (@saharanpurpol) January 20, 2026
सासवडमध्ये अकॅडमीतील विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; धक्कादायक कारणही समोर
धक्कादायक बाब म्हणजे, दोन्ही मुलांच्या कपाळावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. अशोक यांच्या छातीत गोळी लागली होती. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन पिस्तुलं जप्त केली आहेत. एकाच घरात तीन पिस्तुलं सापडल्याने ही घटना केवळ आत्महत्या नसून त्यामागे काही मोठे कारण असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
अशोक राठोड हे सरकारी कर्मचारी होते. ते नाकुर तहसीलमध्ये ‘अमीन’ या पदावर कार्यरत होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांना अनुकंपा तत्त्वावर ही नोकरी मिळाली होती. त्यांचा मोठा मुलगा कार्तिक दहावीत, तर धाकटा मुलगा देव नववीत शिक्षण घेत होता. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे कुटुंब अत्यंत साधे आणि शांत होते, त्यामुळे त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत सर्वजण संभ्रमात आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक राठोड यांनी आधी आपल्या कुटुंबातील सदस्यांवर गोळ्या झाडल्या आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असावी. मात्र, घरात तीन पिस्तुलं सापडल्याने पोलीस ‘मर्डर’ आणि ‘सुसाईड’ अशा दोन्ही कोनातून तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच डीआयजी, एसएसपी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेऊन पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी घर सील केले असून घरातील सर्वांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. मोबाईलच्या कॉल रेकॉर्ड्सवरून काही धागेदोरे मिळतात का, याचा शोध घेतला जात आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूची नेमकी वेळ आणि क्रम (कोणाचा मृत्यू आधी झाला) स्पष्ट होईल. फॉरेन्सिक रिपोर्ट आणि शेजाऱ्यांच्या चौकशीतून अधिक माहिती समोर येईल. एकाच वेळी एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा अंत झाल्याने सहारनपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! मुकुंदवाडी परिसरात टोळक्याचा गोळीबार; नेमकं प्रकरण काय?






