Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agarwal Murder Case : मला लग्न करायचं नाही सांगितलं होतं…, सिया गोयलच्या खुलाशाने लोहगड हत्याकांडात खळबळ

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपासातून नवे खुलासे समोर येत आहेत. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. चौकशीत सियाने केतनसोबत लग्न नको असल्याचे सांगितल्याचा दावा केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 25, 2026 | 12:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची चौकशी सुरू.
  • सियाने लग्नाबाबत नकार दिल्याचा दावा तपासात समोर आला.
  • हत्येच्या कटाशी संबंधित पुरावे पोलिसांकडून तपासले जात आहेत.
पुणे: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल हत्याकांडात दिवसेंदिवस नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे कट असल्याचा तपासातून दावा करण्यात आला आहे. आता चौकशीदरम्यान मुख्य आरोपी सिया गोयलने केलेल्या कथित खुलाशांमुळे या प्रकरणाला आणखी नवे वळण मिळाले आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सियाने केतनसोबत लग्न करण्यास नकार दिला होता आणि याबाबत त्याला सांगितल्याचा दावा केला आहे. (Ketan Agarwal Murder Case)

मी केतनला सांगितलं होतं….

चौकशीदरम्यान सियाने असा दावा केला की, तिने केतनला, तिच्या आणि चेतनमधील प्रेमसंबंधांबद्दल सांगितलं होतं. मला हे लग्न करायचे नाहीये आणि पळून जायचे आहे, असे सियाने केतनला सांगितलं होतं. मात्र, केतन हे लग्न रद्द करण्यास तयार नव्हता. केतनने तिला सांगितलं की आता हे लग्न रद्द होऊ शकत नाही आणि माझं कुटुंब इतके श्रीमंत आहे की तू कुठेही गेलीस तरी तुला शोधून काढू, असं केतन म्हणाल्याचा दाव सियाने केला. (Ketan Agarwal Murder Case)

Nasrapur Case : ‘पश्चात्तापाचा लवलेश नाही’, भीमराव कांबळेला मृत्युदंड…! नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

चेतनसोबतच्या नात्याला कुटुंबाचा नकार

हे लग्न करण्यासाठी माझ्यावर कुटुंबाचा प्रचंड दबाव होता, असं सियाने पोलिसांना सांगितलं. केतनची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली आणि संपन्न आहे, तसेच त्याच्याशी लग्न केल्यास तिचं भविष्य सुरक्षित होईल, असे सियाच्या कुटुंबीयांना वाटत होतं. याउलट, चेतनची आर्थिक स्थिती फार चांगली नसल्याने ते त्याच्यासोबतच्या तिच्या नात्याच्या विरोधात होते. (Ketan Agarwal Murder Case)

अंमली पदार्थांचे व्यसन

सिया आणि चेतन या दोघांनाही अंमली पदार्थांचे किंवा नशिल्या गोष्टींचे व्यसन होते. पोलीस कोठडीत असताना दोघांनीही मद्यपान केल्याची कबुली दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाने बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शाळा सोडली होती. चेतनचे काका नरेश यांनी सांगितले की, सियाच्या काही सवयींमुळे तिचे आई-वडील चिंतेत होते आणि लवकरात लवकर तिचे लग्न लावून तिचे आयुष्य स्थिरावण्याचा त्यांचा विचार होता. (Ketan Agarwal Murder Case)

माफीचा साक्षिदार कोण?

मुख्य आरोपी चेतन चौधरीच्या दुकानात काम करणाऱ्या नीरज कुमारने पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. आता यामुळे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तपासात नीरजच्या मोबाईलचा वापर कसा करण्यात आला, चेतनने आपले लोकेशन लपवण्यासाठी कोणता डाव आखला आणि लोहगडावरील घटनाक्रम काय होता, याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. (Ketan Agarwal Murder Case)

धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; ‘तो’ मेसेज आला अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवाल प्रकरण कुठे घडले?

    Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ही घटना घडली.

  • Que: या प्रकरणात कोणावर आरोप आहेत?

    Ans: सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

  • Que: सियाने चौकशीत काय सांगितल्याचा दावा आहे?

    Ans: तिने केतनसोबत लग्न करायचे नसल्याचे सांगितले होते, असा दावा तपासातून समोर आला आहे.

Web Title: Ketan agarwal murder case i had said i didnt want to get married siya goyals revelation causes a stir in the lohagad murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • crime
  • Ketan Agarwal
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा! हत्या करून चेतनने ‘मिसळ’ खाल्ली अन्…
3

Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा! हत्या करून चेतनने ‘मिसळ’ खाल्ली अन्…

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
4

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.