Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agarwal Muder Case: सीसीटीव्हीतील संशयित चेतनच? लोहगडावर सीन रिक्रिएशन, गेट ॲनॅलिसिसमधून उलगडा होणार

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सिया गोयलनंतर आता आरोपी चेतन चौधरीचे लोहगड किल्ल्यावर सीन रिक्रिएशन करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. सीसीटीव्हीतील संशयित व्यक्ती चेतनच असल्याचा दावा सिद्ध करण्यासाठी गेट ॲनॅलिसिस करण्यात येणार आहे. पावसामुळे तपास प्रक्रियेत अडथळे येत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 01, 2026 | 01:53 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• चेतन चौधरीचे लोहगड किल्ल्यावर सीन रिक्रिएशन करण्यात येणार आहे.
• सीसीटीव्हीतील व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी गेट ॲनॅलिसिसचा वापर केला जाणार आहे.
• हत्येच्या दिवशीच्या 75 मिनिटांत नेमके काय घडले याचा तपास पोलीस करत आहेत.

पुणे: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिला लोहगड किल्ला परिसरात नेऊन गुन्ह्याचे ‘सीन रिक्रिएशन’ करण्यात आले. आता चेतन चौधरी सोबतदेखील ‘सीन रिक्रिएशन’ करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. मात्र, लोणावळा परिसरात होणारा मुसळधार पाऊस या प्रक्रियेत मोठा अडसर ठरत आहे.

गेट ॲनॅलिसिसमधून उलगडा होणार

लोहगड किल्ल्यावर हत्येच्या दिवशी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या संशयास्पद व्यक्तीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी मोठी तयारी सुरू केली आहे. या व्यक्तीची ओळख आरोपी चेतन चौधरी असल्याचा पोलिसांचा दावा असून, तो सिद्ध करण्यासाठी आता त्याचे ‘गेट ॲनॅलिसिस’ करण्यात येणार आहे. या तांत्रिक तपासातून हत्याकांडातील महत्त्वाचा पुरावा समोर येण्याची शक्यता आहे.लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही व्हिडीओत दिसलेली ती संशयास्पद व्यक्ती ज्या पद्धतीने आणि ज्या मार्गावरून चालत किंवा पळत गेली होती, अगदी त्याच मार्गावरून चेतनला चालवले जाईल.

पोलिसांसमोर मोठे आव्हान

गेट ॲनॅलिसिस पूर्णपणे हवामानावर अवलंबून आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पावसात पार पडली, तर चेतनच्या चालण्याची अचूक पद्धत आणि सीसीटीव्ही फुटेजमधील चालण्याची पद्धत मॅच करणे फॉरेन्सिक टीमसाठी कठीण होऊ शकते. त्यामुळे पोलीस पावसाची उघडीप मिळण्याची वाट पाहत आहेत.

Nashik Crime: वर्षभरापूर्वी लग्न, सतत वाद आणि तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबाचा इशारा- ‘अटक करा अन्यथा आत्मदहन करू’

७५ मिनिटांत नक्की काय घडले?

सियाला जेव्हा सीन रिक्रिएशन करण्यासाठी नेण्यात आले तेव्हा तिने हत्येचे ठिकाण दाखवले होते. आता ते हत्येचे ठिकाण आणि चेतन दाखवत असलेले ठिकाण एकाच आहे का? याची पडताळणी केली जाईल. एवढेच नाही तर हत्येच्या दिवशीच्या त्या अत्यंत महत्त्वाच्या ७५ मिनिटांत नक्की काय घडले? याच्यावर देखील भर देणार आहे. न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

शॉपिंगच्या बहाण्याने सियाने केतनला लुटले; एक कोटी घेतले अन् बॉयफ्रेंड चेतनला दिले

 पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्येप्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आता याप्रकरणात पोलिसांनी सिया गोयल आणि बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना अटक केली आहे. 18 जूनला सियाने केतनला लोहगडावरुन ढकलून दिलं आणि तिला तिचा प्रियकर चेतन चौधरीने मदत केली असा आरोप या दोघांवर आहे. या प्रकरणात आता रोज नवनवे खुलासे होत आहेत. सिया गोयलने केतनकडून एक कोटी रुपये घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे. केतनने पैसे दिल्यानंतर तिने ते पैसे प्रियकर चेतनला दिले होते. पोलिस सूत्रांनुसार, चेतनने सियाकडून घेतलेले है पैसे त्याच्या व्यवसायात गुंतवले. केतनच्या तुलनेत चेतनची परिस्थिती चांगली नव्हती. चेतनने सियाला हे सांगितले होते की, आपल्याला लग्न करायचे असेल तर किमान तीन वर्षे तरी हातात हवीत.

Jalna Accident News: जालन्यात भीषण अपघात; भरधाव कारने तलाठ्याला चिरडलं, CCTV मध्ये कैद झाला थरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता कोणाचे सीन रिक्रिएशन होणार आहे?

    Ans: आरोपी चेतन चौधरीचे लोहगड किल्ल्यावर सीन रिक्रिएशन होणार आहे.

  • Que: गेट ॲनॅलिसिस का करण्यात येणार आहे?

    Ans: सीसीटीव्हीमध्ये दिसणारी संशयास्पद व्यक्ती चेतन चौधरीच आहे का, हे तांत्रिकदृष्ट्या तपासण्यासाठी गेट ॲनॅलिसिस केले जाणार आहे.

  • Que: पोलिसांसमोर सध्या कोणते आव्हान आहे?

    Ans: लोणावळ्यातील मुसळधार पावसामुळे सीन रिक्रिएशन आणि गेट ॲनॅलिसिस प्रक्रियेत अडथळे येत आहेत.

Web Title: Ketan agarwal murder case is the suspect in the cctv footage chetan scene reconstruction at lohagad and gait analysis to provide clarity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • chetan chaudhary
  • crime
  • Ketan Agrawal Murder Case

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.