
crime (फोटो सौजन्य: social media)
चेतन चौधरीने काय केला दावा?
पोलिसांच्या चौकशीत चेतन चौधरीने म्हंटले सियासोबत पळून जाऊन कुठेतरी दूर नव्याने आयुष्य सुरू करायचे होते. मात्र, सियाचाच असा आग्रह होता की पळून जाण्याने काही होणार नाही. कारण तिचे कुटुंब प्रचंड श्रीमंत आहे आणि ते त्यांना जगाच्या पाठीवर कुठूनही शोधून काढतील. या लग्नातून सुटकेचा आणि केतनपासून सुटका मिळवण्याचा ‘खून’ हाच एकमेव उपाय असल्याचे सियानेच निश्चित केले होते, असा दावा चेतनने केला आहे.
Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय
सियाने केलेल्या दाव्यात काय?
सियाने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, केतनच्या खुनाचा कट सुरुवातीपासूनच चेतनने रचला होता. लोहगडावर झालेल्या पहिल्या दोन ट्रेकमध्ये सियाला केतनला दरीत ढकलण्याचे धाडस झाले नाही. १४ जून रोजी झालेला प्रयत्न जेव्हा अयशस्वी ठरला, तेव्हा चेतन हताश झाला आणि रडू लागला. त्यानंतर त्याचा संयम सुटला आणि त्याने सियाला स्पष्ट बजावले की, “तुला हे जमणार नाही, आता ही जबाबदारी मी घेतो आणि हे काम पूर्ण करतो.”
सियाच्या भावाची १० तास चौकशी
सियाचा भाऊ साहिल हा चेतनचा जवळचा मित्र असल्याने पोलिसांनी साहिलला ताब्यात घेतले. त्यात त्याने चक्रावून टाकणारी माहिती दिली. सियाने मला केतनसोबत लग्न करायचं नाही, हे कुटुंबीयांना सांगितल्याचं म्हटलं होतं. पंरतु सियाच्या भावाने तिला तोंडावर पाडणारा जबाब पोलिसांना दिला आहे. केतनशी लग्न करायचं नाही, हे सियानं कुणालाही सांगितलं नव्हतं. सियानं मला किंवा कुटुंबीयांना काहीही सांगितलं नाही, सियानं सांगितलं असतं तर कुटुंबीयांनी तिचं लग्न लावलं नसतं, असं या चौकशीत साहिलने पोलिसांना सांगितलं आहे.
Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार
Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ही घटना घडली.
Ans: दोघेही हत्येच्या कटाची जबाबदारी एकमेकांवर टाकत असल्याचे समोर आले आहे.
Ans: पोलिस घटनाक्रम, पुरावे आणि आरोपींच्या जबाबांची पडताळणी करत आहेत.