काय घडलं नेमकं?
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव रवींद्र महाजन असे आहे. त्यांनी डॉ समाधान पाटील (रा. संभाजीनगर) यांना बिनव्याजी पैसे उधारी दिले होते. डॉ. समाधान पाटील (रा. संभाजीनगर) आणि रवींद्र महाजन यांच्यात आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून वाद झाला होता. शुक्रवारे सायंकाळी या दोघांमध्ये झटापट झाली. वेळोवेळी पैसे परत मागूनही पैसे परत न मिळत असल्याने रवींद्र यांनी टोकाचा निर्णय घेण्याचा ठरवलं. त्यांनी रवींद्र महाजन यांनी नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हडिओ पोस्ट केला आहे.
व्हिडिओत काय?
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. ‘माझ्या आत्महत्येस डॉ. समाधान पाटील जबाबदार आहेत. मी त्यांना पैसे मागण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मला पैसे दिले नाही. माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यात यावी. मला सरकारने न्याय द्यावा’, असं त्यांनी आपल्या व्हिडीओत म्हटलं आहे. या व्हिडिओच्या आधारे संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाजन कुटुंब आणि समाजबांधवांकडून करण्यात येत आहे.
पोलीस तपास सुरु
या प्रकरणाची प्राथमिक नोंद भडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून संबंधित परिसर हा रेल्वे पोलिस (GRP) चाळीसगाव यांच्या हद्दीत येत असल्याने पुढील कायदेशीर कार्यवाही त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…
अपघाताचा बनाव करत 26 वर्षीय तरुणाची हत्या; तीन मित्रांनी दगडाने ठेचून मारल्याचा खुलासा
जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. घडलेली घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात कोळन्हावी – डांभुर्णी रस्त्यावर घडली.
Ans: ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडली.
Ans: त्यांनी आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता.
Ans: आर्थिक व्यवहारातून पैसे परत न मिळाल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे..






