Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Murder Case: ‘जे लग्न होणार नाही…’; सियाच्या कथित चॅटमधून धक्कादायक प्लॅनिंगचा खुलासा!

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या मोबाईलमधील डिलीट डेटा रिकव्हर करण्यात आला आहे. त्यातून सांकेतिक भाषेतील कथित चॅट आणि सियाने मैत्रिणीकडे आधार कार्ड मागितल्याचा संदेश समोर आला आहे. या चॅटचा हत्येच्या कटाशी संबंध आहे का, याचा पुणे ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 04, 2026 | 11:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या मोबाईलमधील डिलीट डेटा पोलिसांनी रिकव्हर केला.
  • सियाने मैत्रिणीकडे आधार कार्ड मागितल्याचा कथित चॅट समोर आला असून त्याची चौकशी सुरू आहे.
  • आरोपींच्या मित्रमैत्रिणींची चौकशी सुरू असून हत्येच्या कटाशी संबंधित आणखी धागेदोरे शोधले जात आहेत.
पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा पोलिसांनी रिकव्हर केला असून, त्यातून कथित चॅट आणि सांकेतिक संभाषण उघड झाल्याचा दावा केला जात आहे. त्यातच सियाने तिच्या एका मैत्रिणीकडे “जे लग्न होणार नाही, त्या लग्नाला जायचे तिकीट बुक करण्यासाठी तुझे आधार कार्ड पाठव,” असा कथित संदेश पाठवल्याची माहिती समोर आली असून, या चॅटचा तपासाच्या दृष्टीने पोलीस सखोल तपास करत आहेत.

सांकेतिक भाषा

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तांत्रिक तपास करताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाची माहिती लागली आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुन्हा मिळवला आहे. या डेटामधून धक्कादायक बाबी समोर आल्या असून, दोन्ही आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी एकमेकांशी अत्यंत गुप्त आणि सांकेतिक भाषेत तसेच टोपणनावांचा वापर करून संवाद साधल्याचे उघड झाले आहे.

Mumbai Hit and Run: भरधाव टँकरची डिलिव्हरी बॉयला धडक; जागीच मृत्यू, चालकाला नागरिकांनी पकडलं

आरोपींच्या वर्तुळातील तरुणांची चौकशी सुरू

या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. चेतन आणि सिया यांच्या संपर्कात असलेल्या अनेक मित्रमैत्रिणींचे आणि इतर तरुणांचे जबाब पुणे ग्रामीण पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. या संशयित चॅटिंगची पडताळणी करत असतानाच, या दोघांच्या निकटवर्तीयांकडून हत्येच्या कटाशी संबंधित आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

बीडच्या मित्राने दिला होता खुनाचा बेत रद्द करण्याचा सल्ला?

तपासादरम्यान सर्वात मोठा खुलासा चेतन चौधरीच्या एका वर्गमित्राबाबत झाला आहे. मूळचा बीडचा असलेला हा तरुण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आरोपी चेतनच्या सतत संपर्कात होता. धक्कादायक बाब म्हणजे, केतन अग्रवाल यांच्या हत्येच्या संपूर्ण कटाची पूर्वकल्पना या मित्राला होती. मात्र, त्याने या गुन्ह्यात भाग न घेता उलट चेतन आणि सिया या दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला होता. “केतनचा जीव घेण्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका,” असे सांगून त्याने दोघांना या कृत्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती आता समोर येत आहे.

Ketan Agrawal Murder Case: सिया-चेतनला मोठा दिलासा! पोलीस कोठडी वाढवण्यास कोर्टाचा नकार; न्यायालयीन कोठडीत रवानगी

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात कोणता नवा खुलासा झाला आहे?

    Ans: सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या मोबाईलमधील डिलीट डेटा रिकव्हर करण्यात आला असून, त्यातून सांकेतिक भाषेतील कथित चॅट समोर आले आहेत.

  • Que: सियाच्या कथित चॅटमध्ये काय आढळले?

    Ans: सियाने तिच्या एका मैत्रिणीकडे "जे लग्न होणार नाही, त्या लग्नाला जायचे तिकीट बुक करण्यासाठी तुझे आधार कार्ड पाठव" असा कथित संदेश पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

  • Que: पोलिसांचा पुढील तपास कोणत्या दिशेने सुरू आहे?

    Ans: पोलिस आरोपींच्या मित्रमैत्रिणींची चौकशी करत असून, कथित चॅट, सांकेतिक संदेश आणि संभाव्य सहआरोपींचा तपास करत आहेत.

Web Title: Ketan agrawal murder case the wedding that wont happen siyas alleged chats reveal a shocking plot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • crime
  • Ketan Agrawal
  • Pune Crime
  • Siya Goyal

संबंधित बातम्या

Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
1

Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

मागासवर्गीय आयोगाचा सदस्य म्हणून मिरवला, पोलिसांची सलामीही घेतली; सत्य समोर येताच उडाली खळबळ
2

मागासवर्गीय आयोगाचा सदस्य म्हणून मिरवला, पोलिसांची सलामीही घेतली; सत्य समोर येताच उडाली खळबळ

दुध खरेदीप्रमाणे पुण्यात गांजा खरेदीसाठी लाईन! एएनटीएफची मोठी कारवाई; 40 जणांना पकडले
3

दुध खरेदीप्रमाणे पुण्यात गांजा खरेदीसाठी लाईन! एएनटीएफची मोठी कारवाई; 40 जणांना पकडले

तिकीट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला; हात-पाय बांधले, तोंडात रुमाल कोंबला अन्…
4

तिकीट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला; हात-पाय बांधले, तोंडात रुमाल कोंबला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.