काय घडलं नेमकं?
अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव हर्ष असे आहे. तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. भरधाव टँकरने हर्षच्या दुचाकीला भीषण धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की हर्षचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर टँकर चालकाने तिथे थांबण्याऐवजी टँकरसह घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत टँकरचा पाठलाग केला आणि चालकाला रंगेहाथ पकडले. टँकर चालक पूर्णपणे मद्यधुंद (दारूच्या नशेत) असल्याचा प्राथमिक दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्यांनतर संतप्त नागरिकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले.
गुन्हा दाखल
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हर्षचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी निष्काळजीपणे आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील सखोल तपास पोलीस करत आहे.
मोबाईलवर अश्लील मेसेज, भेटीसाठी दबाव अन् धमकी; अल्पवयीन दिराने वहिनीविरोधात केली तक्रार
मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन दिराने आपल्या १७ वर्षीय वहिनीविरोधात तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे. वाहिनीने अल्पवयीन दिरावर खोटी अत्याचाराची केस टाकण्याची धाकी देऊन लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी 32 वर्षीय वाहिनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेली घटना पवई येथील आहे.






