Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२५० सीसीटीव्हींचा माग, १० दिवसांची मेहनत; अखेर सराईत चोरट्याला पाठलाग करुन पकडले

पायी जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पसार होणाऱ्या सराईत चोरट्याला चतुःशृंगी पोलिसांनी दहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बेड्या ठोकल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 05, 2026 | 04:26 PM
२५० सीसीटीव्हींचा माग, १० दिवसांची मेहनत; अखेर सराईत चोरट्याला पाठलाग करुन पकडले

२५० सीसीटीव्हींचा माग, १० दिवसांची मेहनत; अखेर सराईत चोरट्याला पाठलाग करुन पकडले

Follow Us
Follow Us:
  • जबरी चोरीतील आरोपी दहा दिवसांच्या शोधानंतर जेरबंद
  • हडपसर परिसरातून पाठलाग करून अटक 
  • ३ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त
पुणे : पायी जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पसार होणाऱ्या सराईत चोरट्याला चतुःशृंगी पोलिसांनी दहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील विविध भागांतील तब्बल २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी आरोपीचा माग काढला आहे. हडपसर परिसरात पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरीचा मुद्देमाल असा एकूण ३ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

 

राजाभाऊ ऊर्फ राजू खेमू राठोड (वय ४४, रा. लेन क्रमांक ४, आर्वी गाव, साई रोड, जि. लातूर; मूळ रा. एकंबी तांडा, ता. औसा, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शितल जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे व त्यांच्या पथकाने केली आहे.

गेल्या महिन्यात (दि. २० ऑक्टोबर २०२६) सकाळी नऊच्या सुमारास तक्रारदार पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सलग दहा दिवस औंध, पाषाण, बाणेर, बावधन, कोथरूड, सुस, लवळे, धायरी, नानापेठ आणि हडपसर परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून आरोपीचा माग काढला. त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर परिसरातून पाठलाग करून आरोपीला पकडण्यात आले. तपासादरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि जबरी चोरी करून हिसकावलेला मुद्देमाल जप्त केला.

हे सुद्धा वाचा : आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस

७० हून अधिक गुन्ह्यांची नोंद

अटक केलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, लातूर, नाशिक आणि सातारा या ठिकाणी जबरी चोरीचे ७० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक अनिकेत पोते करीत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चतुःशृंगी पोलिसांनी कोणाला अटक केली?

    Ans: राजाभाऊ ऊर्फ राजू खेमू राठोड (वय ४४, रा. आर्वी गाव, जि. लातूर) याला अटक करण्यात आली आहे. तो पायी जाणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार होणारा सराईत चोरटा आहे.

  • Que: आरोपीला पोलिसांनी कसे पकडले?

    Ans: पोलिसांनी १० दिवस सलग औंध, पाषाण, बाणेर, बावधन, कोथरूड, सुस, लवळे, धायरी, नानापेठ आणि हडपसर परिसरातील २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर परिसरात पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

  • Que: आरोपीकडून काय जप्त करण्यात आले? आरोपीवर किती गुन्हे आहेत?

    Ans: आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरीचा मुद्देमाल असा एकूण ३ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, लातूर, नाशिक आणि सातारा येथे जबरी चोरीचे ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

Web Title: After a ten day search the police have arrested the thief nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Intercaste Marriage: नात्यातील मुलीचा आंतरजातीय विवाह लावून देणे पडले महागात; भटजीच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून कोयत्याने…
1

Intercaste Marriage: नात्यातील मुलीचा आंतरजातीय विवाह लावून देणे पडले महागात; भटजीच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून कोयत्याने…

Factory Owner Kills Worker: मुलीसोबतच्या प्रेमसंबंधांचा संताप अन् क्रिकेट बॅटने रात्रभर अमानुष मारहाण! फॅक्टरी मालकाने…
2

Factory Owner Kills Worker: मुलीसोबतच्या प्रेमसंबंधांचा संताप अन् क्रिकेट बॅटने रात्रभर अमानुष मारहाण! फॅक्टरी मालकाने…

Mhada Colony Robbery: मुलांच्या पिगी बँकेपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत झाडून लांबवले; म्हाडा कॉलनीत लाखोंची घरफोडी!
3

Mhada Colony Robbery: मुलांच्या पिगी बँकेपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत झाडून लांबवले; म्हाडा कॉलनीत लाखोंची घरफोडी!

Shraddha Lucknow News: खाजगी फोटो दाखवून ब्लॅकमेलिंग अन् नग्न करून नाचवण्याचा खेळ! श्रद्धा आणि तिच्या साथीदारांच्या टॉर्चरने…
4

Shraddha Lucknow News: खाजगी फोटो दाखवून ब्लॅकमेलिंग अन् नग्न करून नाचवण्याचा खेळ! श्रद्धा आणि तिच्या साथीदारांच्या टॉर्चरने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.