Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : खारघर पोलिसांची मोठी कामगिरी! ९४.७४ लाखांचा मुद्देमाल मुळ मालकांना परत

Navi Mumbai Crime News : खारघर पोलिसांनी घरफोडी, जबरी चोरी आणि मोबाईल चोरी प्रकरणांचा तांत्रिक तपास करत विविध राज्यांतून तब्बल ९४.७४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मुळ मालकांना परत केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 19, 2026 | 03:05 PM
खारघर पोलिसांची मोठी कामगिरी! ९४.७४ लाखांचा मुद्देमाल मुळ मालकांना परत

खारघर पोलिसांची मोठी कामगिरी! ९४.७४ लाखांचा मुद्देमाल मुळ मालकांना परत

Follow Us
Follow Us:
  • खारघर पोलिसांची मोठी कामगिरी
  • ९४.७४ लाखांचा मुद्देमाल मुळ मालकांना परत
  • तांत्रिक तपास करत विविध राज्यांतून मुद्देमाल जप्त
सावन वैश्य, नवी मुंबई : खारघर पोलीस ठाण्याने २०२५–२६ या कालावधीत घडलेल्या जबरी चोरी, घरफोडी, मोबाईल चोरी तसेच हरविलेल्या मोबाईल प्रकरणांचा कसून आणि तांत्रिक पद्धतीने तपास करत तब्बल ९४ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तो आज मुळ मालकांना परत केला. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांत घरफोडी, जबरी चोरी आणि मोबाईल चोरीच्या विविध घटना घडल्या होत्या. या घटनांचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये जाऊन पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला.

त्या रात्री नक्की काय घडलं? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाने संपवलं आयुष्य, वधूसह 4 जणांवर FIR दाखल

या कारवाईत पोलिसांनी एकूण ५७ तोळे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत सुमारे ५७ लाख रुपये आहे, ते हस्तगत केले. तसेच घरफोडी प्रकरणातील २७ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. याशिवाय हरविलेले आणि चोरीस गेलेले ५० मोबाईल फोन, ज्यांची किंमत १० लाख ७४ हजार रुपये आहे, तेही शोधून काढण्यात आले. जप्त केलेला सर्व मुद्देमाल आज संबंधित मुळ मालकांना परत करण्यात आला. अनेक नागरिकांनी हरविलेला मुद्देमाल परत मिळाल्याने खारघर पोलिसांचे आभार मानले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी, पोलीस निरीक्षक अशोक डमाळे, पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, शितल पाटील व त्यांच्या पथकाने सहायक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली. खारघर पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला असून नागरिकांनीही पोलिसांच्या तांत्रिक तपास कौशल्याचे कौतुक केले आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. या कारवाईत अनेक चोरीच्या प्रकरणांची उकल झाली असून आरोपींकडून मोबाईल फोन, दागिने, वाहनांसह इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या.

खारघर पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, आपला हरवलेला किंवा चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Parbhani Crime: परभणीत थरार! कोयत्याने सपासप वार; तरुणाचा पंजा मनगटापासून वेगळा

Web Title: Kharghar police return seized property worth 94 lakh to original owners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Navi Mumbai : संशयाच्या आगीत दोन कुटुंबं उद्ध्वस्त; नवविवाहितेची दोन महिन्यांनंतर प्राणज्योत मालवली,आरोपी पती पोलिसांच्या कोठडीत
3

Navi Mumbai : संशयाच्या आगीत दोन कुटुंबं उद्ध्वस्त; नवविवाहितेची दोन महिन्यांनंतर प्राणज्योत मालवली,आरोपी पती पोलिसांच्या कोठडीत

Washim News: ‘कोम्बिंग’मध्ये ७ फरार आरोपी जेरबंद; वाशिम पोलिसांनी जिल्ह्यामध्ये राबविली शोधमोहीम
4

Washim News: ‘कोम्बिंग’मध्ये ७ फरार आरोपी जेरबंद; वाशिम पोलिसांनी जिल्ह्यामध्ये राबविली शोधमोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.