crime (फोटो सौजन्य: social media)
कोल्हापूर: कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाचा ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे हा व्यक्ती गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबतची तक्रार त्याच्या बहिणीने पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तपास केला असून याबाबतीत आठ दिवसांनी या प्रकारचा छडा लागला आहे. ग्रामपंचायत सदस्याच्या खून झाल्याचा प्रकार उघडकीस आले आहे.या हत्या प्रकरणी चार संशयीतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्यांनंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. आरोपींनी लखनचे हात, पाय आणि शीर धडापासून वेगळं केलं आणि त्याच्या शरीराचे तुकडे पोत्यात भरून ते हिरण्यकेशी नदीत फेकल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. या प्रकरणात अनेक धक्कदायक खुलासे समोर येत आहे.
नेमकं काय प्रकार?
मृतक लेखन बेनाडे हा एका महिलेच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी करत होता. याचा राग मनात धरून त्याची हत्या केल्याचे शुक्रवारी उघड झाले. बेनाडे यांचा आरोपी महिला लक्ष्मी घस्ते हिच्यासोबत वाद होता. यातून बेनाडे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रार करीत होता. याचा राग मनात ठेवून सायबर चौकात बेनाडेचा 10 जुलैला पाठलाग करून पाच आरोपींनी त्यांना तवेरा गाडीत जबरदस्तीने घातलं. त्याला संकेश्वर येथे नेलं. तिथे गेल्यावर तलवार, एडका, चॉपर या धारदार हत्याराने बेनाडेचं डोके, दोन्ही हातपाय धडापासून वेगळे केले. अतिहय क्रूरपणे हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी हिरण्यकेशी नदीत फेकून दिला होता.
याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. विशाल बाबूराव घस्ते, आकाश ऊर्फ माया दीपक घस्ते (रा. तामगाव, ता. करवीर), संस्कार महादेव सावर्डे (रा. देवाळे, ता. करवीर), अजित उदय चुडेकर (रा. राजकपूर पुतळा, जुना वाशी नाका, कोल्हापूर), लक्ष्मी विशाल घस्ते (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे.
सुरक्षारक्षकाचीच सुरक्षा धोक्यात; चाकूने भोसकून केली हत्या, मध्यरात्री घडला थरार
दरम्यान, नागपुरात एक हत्येची धक्कादायक घटना समोर येत आहे. लुटपाट करण्यासाठी आलेल्या आरोपींनी विरोध करणाऱ्या सुरक्षारक्षकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास प्रजापतीनगरात घडली. वाठोडा पोलिसांनी खून आणि लूटपाट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली.कुणाल भैयालाल वानखेडे (वय 20) आणि घनश्याम ऊर्फ अनूप बबली वंजारी (वय 23, दोन्ही रा. भांडेवाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या घटनेत एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. लक्ष्मण मुळे (वय 48, रा. भरतवाडा रोड, पारडी) असे हत्या झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
पुण्यात भरपावसात विवाहित महिलेवर बलात्कार; शेतातील झुडपात नेले अन्…