अकोल्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका चौथ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींच्या तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीच्या बापानेच विनयभंग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अकोल्याच्या जुने शहर पोलिसांनी बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून वर्ग मैत्रिणीच्या बापाला अटक केली आहे. हा प्रकार अकोला पातूर रोडवरील एका गावात जिल्हा परिषदच्या चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घडला.
30 हजाराची लाच मागणं भोवलं! महिला पोलीस हवालदारासह दोघांना रंगेहात पकडले
नेमकं काय घडलं?
जुने शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी शाळेत जाण्यासाठी घरून निघाली. त्याच रस्त्यावरच आपल्या वर्ग मैत्रिणीचा घर पडतो म्हणून ती आपल्या वर्ग मैत्रिणीला सोबत घेण्यासाठी तिच्या घराजवळ गेली असता त्याच ठिकाणी वर्गमैत्रिणीचा बाप सत्यपाल सावध तिथेच होता. त्याने माझ्या मुलीची “टाय व्यवस्थित करून दे असे म्हणत पीडित अल्पवयीन मुलीला घरात बोलावले. आपल्या वर्गमैत्रीणीची टाय सरळ करण्यासाठी गेली. या साधीच फायदा घेत सत्यपाल सावधने मुलीच्या तोंडावर हात फिरवून तिच्या शरीराला वाईट हेतूने स्पर्श करून तिचा विनयभंग केला.
या दरम्यान ती रडायला लागली तेव्हा पीडित अल्पवयीन मुलीला पैसे देण्याचे आमिष देऊन ही गोष्ट कोणालाही सांगू नको असं म्हंटल. मुलीने आरोपीच्या तावडीतून आपली सुटका केली. ती शाळेत येऊन पायऱ्यांवर रडत बसली. वर्गशिक्षिका तिच्याजवळ गेली व तिची विचारपूस केली असता तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या वर्गशिक्षिकेला सांगितले. वर्ग शिक्षिकेने तिच्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी तक्रार अकोल्याच्या जुने शहर पोलीस स्टेशनला दिली असून मुलीला वाईट हेतूने स्पर्श करणाऱ्या सत्यपाल सावध विरोधात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच्या विरोधात 74,75 बीएनएसनुसार विविध कलमाने आणि बाल संरक्षण कायद्यानुसार कारवाई करून आरोपीला अटक केली आहे.
अकोल्यात वर्चस्वासाठी दोन गटात गँगवॉर; गोळीबारात आठ जण जखमी, पोलिसांनी काढली घटनास्थळावरून आरोपींची धिंड
दरम्यान, अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला शहरात शुक्रवारी (१८ जुलै) ला दोन गटात वाद होत गॅंगवॉर झाला होता. हा गॅंगवॉर वर्चस्वाच्या लढाईतून झाला होता. यात ताल्वारीसह बंदुकीचा वापर झाला होता. या वादादरम्यान दोन गट आमने -सामने भिडले. गोळीबार करण्यात आला. एक हवेत गोळी फायर करण्यात आली होती. या संपूर्ण गॅंगवॉरमध्ये जवळपास ८ जण जखमी झाले होते. घटनस्थळावरून २ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. काही जखमी आरोपींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु केले आहे. ही घटना कृषी नगर परिसरात घडली आहे. दरम्यान आरोपींची घटनास्थळी पोलिसांनी धिंड काढली.
सुरक्षारक्षकाचीच सुरक्षा धोक्यात; चाकूने भोसकून केली हत्या, मध्यरात्री घडला थरार