Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ

नवरात्रोत्सवाच्या जल्लोषात अचानक गोळीबाराचा आवाज घुमला अन् परिसरात एकच खळबळ उडाली! आरतीच्या निमंत्रणावरून झालेल्या वादात मंडळाच्या अध्यक्षानेच रिव्हॉल्व्हर काढली. झटापटीत गोळीबार झाला; सुदैवाने गोळी जमिनीच्या दिशेने गेल्याने मोठा अनर्थ टळला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 15, 2026 | 01:27 PM
Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ

Follow Us
Follow Us:
  • आरतीच्या निमंत्रणावरून मंडळात अंतर्गत वाद
  • झटापटीत रिव्हॉल्व्हरमधून एक राऊंड फायर
  • मंडळ अध्यक्ष विजयकुमार पाटील यांना अटक

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच कोल्हापुरातील शाहूनगर परिसरात धक्कादायक घटना घडली. मानपान आणि आरतीच्या निमंत्रणावरून झालेल्या वादातून नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षाने थेट मंडपात रिव्हॉल्व्हर काढून गोळीबार केला. झटापटीदरम्यान रिव्हॉल्व्हरमधून एक राऊंड फायर झाला. सुदैवाने गोळी जमिनीच्या दिशेने गेल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार शंकरराव पाटील यांना अटक केली असून रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे.

आरतीच्या निमंत्रणावरून वाद

शाहूनगरमधील दत्त गल्ली येथे राजर्षी शाहू फ्रेंड सर्कलच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील आहेत. नवरात्रोत्सवादरम्यान संध्याकाळच्या आरतीसाठी मंडळातील कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवर्जून निमंत्रित केले जाते. यंदा सुधीर खेबुडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आरतीचे निमंत्रण देण्यात आले नसल्याने मंडळातील अंतर्गत वादाला तोंड फुटले.

हेही वाचा: Chtrpati sambhajinahra: मुलीवर अत्याचाराचा गुन्हा मिटवण्यासाठी आईनेच मागितले ३९ लाख; २५ हजार घेताना रंगेहात अटक

कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद

मंगळवारी रात्री हा वाद मिटवण्यासाठी मंडळातील काही कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी सुधीर खेबुडे यांनी सिद्धेश थोरवत यांना त्यांच्या कुटुंबीयांना आरतीसाठी का बोलावले नाही, अशी विचारणा केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादाची माहिती मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील यांना मिळाल्यानंतर वातावरण आणखी तणावपूर्ण झाले. दरम्यान, खेबुडे यांच्यासह काही कार्यकर्ते बाजूला जाऊन थांबले होते. ते आपल्याबद्दलच बोलत असल्याचा गैरसमज झाल्याने पाटील संतापले.

रिव्हॉल्व्हर काढली अन् झटापटीत फायर

संतापाच्या भरात विजयकुमार पाटील यांनी रिव्हॉल्व्हर बाहेर काढली. त्यांना रोखण्यासाठी काही कार्यकर्ते धावत पुढे आले. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या हातातील रिव्हॉल्व्हरमधून एक राऊंड फायर झाला. गोळी जमिनीच्या दिशेने झाडली गेल्याने सुदैवाने कोणालाही लागली नाही. मात्र, गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने नवरात्रोत्सवाच्या मंडपात आणि परिसरात एकच धावपळ उडाली. ऐन उत्सवाच्या काळात मंडपातच गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

हेही वाचा: ‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा

पोलिसांची तत्काळ कारवाई

घटनेनंतर मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास मंडळातील काही पदाधिकाऱ्यांनी आपापसात वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची शहानिशा करून गुन्हा दाखल केला. सुधीर दत्तात्रय खेबुडे (वय ३६, रा. शाहूनगर) यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली. या प्रकरणी विजयकुमार शंकरराव पाटील (वय ५९, रा. प्रतिभानगर, सध्या न्यू पॅलेस परिसर) यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरही पोलिसांनी जप्त केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबाराचे कारण काय होते?

    Ans: आरतीसाठी काही कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना निमंत्रण न दिल्याने मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. याच वादातून गोळीबाराची घटना घडली.

  • Que: गोळीबारात कोणी जखमी झाले का?

    Ans: झटापटीदरम्यान एक राऊंड फायर झाला. गोळी जमिनीच्या दिशेने गेल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

  • Que: पोलिसांनी काय जप्त केले?

    Ans: पोलिसांनी पाटील यांच्याकडील रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे

Web Title: Kolhapur navratri mandal firing president arrested sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Firing News
  • kolhapur

संबंधित बातम्या

‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा
1

‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा

Crime News: आई-वडील जेवायला गेले अन् सहा वर्षांच्या चिमुरडीसोबत घडला धक्कादायक प्रकार
2

Crime News: आई-वडील जेवायला गेले अन् सहा वर्षांच्या चिमुरडीसोबत घडला धक्कादायक प्रकार

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…
3

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

Jai Jai Swami Samarth: रणजीतरूपी महिषासुराचा संहार होणार? स्वामींच्या दिव्य लीलेतून उलगडणार 4 स्त्रियांचं रहस्य; मालिकेला नवं वळण
4

Jai Jai Swami Samarth: रणजीतरूपी महिषासुराचा संहार होणार? स्वामींच्या दिव्य लीलेतून उलगडणार 4 स्त्रियांचं रहस्य; मालिकेला नवं वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.