Crime News: कोल्हापूरसह कोकणात धुमाकूळ घालणारा चोरटा जेरबंद; 15 मोटरसायकल अन् 10 लाख...
सराईत चोरट्यास पोलिसांकडून अटक
तब्बल १५ मोटरसायकली हस्तगत
साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू
इचलकरंजी: कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण आणि कर्नाटकात धुमाकूळ घालणार्या अक्षय राजू शेलार (वय २५, मूळ रा. भगतसिंग चौक, जवाहरनगर, सध्या रा. राशीन, ता. कर्जत) या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले आहे. त्याच्याकडून विविध ठिकाणाहून चोरलेल्या १० लाख २५ हजार रुपये किंमतीच्या तब्बल १५ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. तर त्याच्या साथीदाराचाही शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या वाहन चोरीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सुचना केल्या होत्या. त्यानुसार कळमकर यांनी पथक नेमून तपासाच्या सूचना केल्या होत्या.
तपासादरम्यान रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अक्षय शेलार याने त्याच्या साथीदारांसह कोल्हापूर जिल्ह्यास कोकण व कर्नाटक भागातून मोटरसायकली चोरल्याची व तो शाहू टोल नाका परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरिक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने सापळा रचून अक्षय शेलार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली बुलेट त्याने वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली.स ्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Kolhapur Crime: 6 नृत्यांगनांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; हाताच्या नसा कापल्या अन्…; कारण काय?
मोटरसायकल चोरीचे १० गुन्हे उघडकीस
अधिक चौकशीत शेलार याने साथीदार विजय गुरव (रा. शिरगाव, ता. शाहुवाडी) याच्या सहकार्याने पन्हाळा, पेठवडगाव, शाहुवाडी, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, राजापूर (जि. रत्नागिरी), कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) आणि सांगली, निपाणी (कर्नाटक) आदी भागातून मोटरसायकली चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून मोटरसायकल चोरीचे १० गुन्हे उघडकीस आले असून १५ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या मोटरसायकली त्याने म्हसोबा माळ गोकुळ शिरगाव येथील कौतुक कुडेकर यांच्या घरासमोर गेटच्या आत ठेवल्या होत्या. तर साथीदार विजय मधुकर गुरव याचा शोध घेतला जात आहे.
6 नृत्यांगनांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एका परिसरात 6 नृत्यांगनांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या 6 महिलांनी सामूहिकपणे हाताच्या नसा कापून आपले जीव संपवण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात देहविक्रीच्या संशयातून 6 नृत्यांगनांना ताब्यात घेण्यात आले आहे. या नृत्यांगनांनी आपल्या हाताच्या नसा कपासून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. महिला सुधारगृहात हा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर त्यांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.