कोल्हापूरमध्ये 6 महिलांचा आत्महत्येचा प्रयत्न (फोटो- istockphoto)
कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एका परिसरात 6 नृत्यांगनांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या 6 महिलांनी सामूहिकपणे हाताच्या नसा कापून आपले जीव संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात देहविक्रीच्या संशयातून 6 नृत्यांगनांना ताब्यात घेण्यात आले आहे. या नृत्यांगनांनी आपल्या हाताच्या नसा कपासून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. महिला सुधारगृहात हा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर त्यांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार या नृत्यांगनांना देहविक्रीच्या संशयातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आले होते. गेले काही महीने त्या सुधारगृहात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात त्यांना जामीन मिळवा यासाठी त्या वारंवार अर्ज देखील करत असल्याचे समजते आहे.
दरम्यान या प्रकरणात जामिन मिळत नसल्याने या नृत्यांगनांनी आपल्या हाताच्या नसा कापून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व नृत्यांगनांवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू केले जात आहेत.
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं
दिल्लीतुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याहून ७ वर्ष लहान असलेल्या अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले नंतर त्याने तिला तिच्या घरातून पळवून नेलं. आरोपीने पिडीतेसोबत अतिशय घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. तिला नको त्या अवस्थेत रस्त्यावर सोडून दिल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी १६ महिन्यानंतर या नराधमाला दिल्लीच्या लक्ष्मीनगर परिसरातून अटक केले आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की 28 मे 2024 रोजी पीडितेच्या आईने स्वरूप नगर पोलीस स्टेशनमध्ये तिची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी 27 मे 2024 पासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पीडितेचा शोध घेण्यास सुरूवात केली. अखेर, 15 दिवसांनंतर पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी सुरु केली.
पीडितेने घडलेल्या घटनेबद्दल पोलिसांना सांगितलं की, आरोपी तिला प्रेमाचं आमिष दाखवून बिहारच्या पाटणा येथे घेऊन गेला आणि तिथे तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पोक्सो अॅक्ट अंतर्गत तसेच अपहरण आणि बलात्कार अशा कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी आरोपी फरार होता आणि त्यानंतर हे प्रकरण पोलिसांनी क्राइम ब्रांचकडे सोपवलं.