सौजन्य फोटो - सोशल मिडीया
पती अक्षय अरविंद झांबरे (वय ३५), सासरा अरविंद वसंतराव झांबरे (वय ६८) आणि सासू मंगल अरविंद झांबरे (वय ५८, सर्व रा. मुकुंदनगर) यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी आणि तक्रारदारांच्या वकिलांनी जप्त केलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्यातील संभाषणे व संदेशांची पडताळणी करण्यासाठी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली, जी न्यायालयाने मान्य करत आरोपींच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपी आणि पायलची नणंद अक्षता झांबरे-निम्हण हिचा पोलीस कसून शोध घेत आहेत. पोलिसांच्या तपासात ३५ तोळे सोने हाती लागले असले, तरी उर्वरित १५ तोळे सोने अद्याप मिळालेले नाही; ते फरार अक्षताकडे असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.
दुसरीकडे, या गुन्ह्यात नाव आल्यापासून फरार असलेली आरोपी अक्षता झांबरे-निम्हण हिने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर न्यायालयाने पोलीस आणि सरकार पक्षाचे म्हणणे मागितले असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Ans: पोलिसांनी आरोपींच्या घरातून ३५ तोळे सोने, चांदीचे दागिने, पती व सासऱ्याचे मोबाईल, मृत पायलचा मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे.
Ans: पती, सासू आणि सासऱ्याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे.
Ans: गुन्ह्यातील उर्वरित १५ तोळे सोने फरार असलेली नणंद अक्षता झांबरे-निम्हण हिच्याकडे असल्याचा पोलिसांना संशय आहे.






