crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली त्यांनतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची समोर आली आहे. रोहिणी पाटील असं मृत महिलेचे नाव आहे. तर प्रशांत पाटील असं पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. रोहित हत्या करून पळून गेला होता. प्रशांत पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव रोहिणी प्रशांत पाटील (वय २८, रा. भादोले, ता. हातकणंगले) असे आहे. भादोले येथील प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी हिच्यासमवेत तिच्या माहेरी ढवळी (जि. सांगली) येथे वडील आजारी असल्याने आठवडाभरापासून ये-जा करत होता. सोमवारी सायंकाळी ढवळी येथून पती-पत्नी दोघे भादोलेला येण्यासाठी मोटारसायकलने येत होते. दरम्यान, रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते कोरेगाव भादोले रस्त्यावर झुंजीनाना मळ्याजवळ हे दोघे आले असता प्रशांत याने रोहिणी हिच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार करून तिला संपवलं.
त्यानंतर तेथून भादोले येथे येऊन त्याने गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगून मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच-सहा महिने येणार नाही असे सांगून पळून गेला होता. या घटनेने गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संशयित आरोपी प्रशांत पाटील याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संध्याकाळी भावासोबत दूध आणायला निघाली, आरोपींनी डाव साधला; पण धाडसी चिमुरडीने अपहरणाचा प्रयत्न उधळून लावला
कोल्हापूरच्या नांदणीत लहान मुलांच्या अपहरणाचा प्रकार उघडकीस आला आहे. यात दूध आणायला गेलेल्या चिमुकल्याचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र चिमुकलीने आपल्या धाडसाने हा प्रयत्न फसला. या प्रकरणी शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत.
तरूणाला घरी बोलावलं अन् नंतर गळा चिरून हत्या केली; झारखंडमधील धक्कादायक प्रकार समोर