धुळे येथून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भारण्यावरून शाळेत काही पालकांनी शाळेतील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्ही शाळेला टाळे ठोकून काम बंद आंदोलन करू, अशी आक्रमक भूमिका शाळा प्रशासनाने घेतली आहे.
Akola Crime: अकोल्यात सावत्र बापाचा नराधम कृत्य; पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत
नेमकं काय घडलं?
संपूर्ण राज्यात बारावीचा फॉर्म भरण्याचा काळ सुरू आहे. यादरम्यान धुळे जिल्ह्यातील आर्वी येथील शाळेत फॉर्म भरण्याचे काम जोरात सुरु होते. मात्र या प्रक्रियेत काही पालकांनी विद्यार्थिनीला न आणत फॉर्म भरून घेण्यास जोरदार आग्रह केला. . कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनी स्वतः येणे आवश्यक असल्याचे सांगितले असता, पालक संतप्त झाले आणि त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. एवढेच नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी सुद्धा दिल्याचे समोर आले आहे.
शाळा प्रशासनाचा आरोप काय?
या मारहाणीनंतर काही वेळातच गावगुंड त्या शाळेत आले. गावगुंड बाबुराज कान्होर, किशोर आल्होर यांनी आपल्या साथीदारांसह शाळेचे लिपिक पंकज घोरपडे यांच्यावर हल्ला केला. त्यांनी त्यांना मारहाण करून बारावीच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म फाडले आणि सुमारे 25 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन फरार झाले, असे आरोप शाळा प्रशासनाने केला आहे
मागणी काय?
या गंभीर घटनेनंतर शाळा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. तसेच, आरोपींविरुद्ध कडक कारवाई न झाल्यास शाळा टाळे ठोकून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दोन दिवसांपूर्वी वाढदिवस आणि…, माजी स्थायी समिती सभापतींच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल
धुळे शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज शिंदे याने आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याचा वाढदिवस (9 सप्टेंबर) मंगळवारी साजरा करण्यात आला. त्याच्या दोन दिवसांनी त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Pune Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु, पोलिसांनी छापा टाकत पाच महिलांची केली सुटका