तरूणाला घरी बोलावलं अन् नंतर गळा चिरून हत्या केली; झारखंडमधील धक्कादायक प्रकार समोर (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
गोलमाडी : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. त्यातच आता झारखंडमधील गोलमाडी येथे धक्कादायक घटना समोर आली. येथील रहिवासी संदीप याने 20 वर्षीय अजयची हत्या केली. संदीपने आधी अजयला घरी बोलावलं नंतर त्याचा गळा चिरून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत गोलमाडी ग्रामस्थांनी सांगितले की, मृत अजय याला संदीपने घरी बोलावलं. अजय आणि संदीप हे दोघे घरात एकटेच असताना त्यावेळी आरोपीने त्याचा गळा चिरून अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. याप्रकरणानंतर ग्रामस्थांनी संदीपला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. संदीपला तंत्राचे ज्ञान मिळवण्यासाठी एका तरुणाची हत्या करायची होती. यासाठी त्याने अजयच्या घरी फोन करून त्याला बोलावून घेतले आणि नंतर त्याचा जीव घेतला, असा संशय आता व्यक्त केला जात आहे.
हेदेखील वाचा : Dhule Crime : शाळेत बारावी फॉर्म भरताना मोठा वाद; पालकांकडून कर्मचाऱ्यावर हल्ला, २५ हजार रोकड लंपास; नेमकं काय घडलं?
तर दुसरीकडे, आरोपी संदीपच्या एका मित्राने पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. तंत्रशास्त्रात प्रसिद्धी मिळवण्यासाठी एखाद्या पुरूषाने अशाप्रकारे प्रयत्न केल्याने याप्रकरणाची एकच चर्चा सुरु आहे. मात्र, यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. अनेक घटनांमध्ये लहान निष्पाप मुले बळी पडली आहे. मात्र, झारखंडच्या या प्रकरणात तरुणाचा बळी गेल्याने सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
दरम्यान, याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु करण्यात येत आहे. यातील आरोपीला सध्या अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून अधिक माहिती घेतली जात आहे. या चौकशीनंतरच या हत्येमागचे खरे कारण समोर येणार आहे.
नवी मुंबईतही खूनप्रकरण समोर
नवी मुंबई येथील करावे गावातून एक धक्कदायक हत्येची बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून एनआरआय पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.