बापलेकाचे अपहरण : ऊसतोडीला येत नसल्याने केले अपहरण
छत्रपती संभाजीनगर : ऊसतोडीच्या कामावर येत नसल्याच्या रागातून मुकादमाने ऊसतोड मजुरासह त्याच्या 17 वर्षीय मुलाचे अपहरण केले. करुन जालन्यात डांबून ठेवत मारहाण करण्यात आली. तसेच अपहतच्या नातेवाईकांडे 10 लाखांच्या खंडणीची मागणी केली. हा प्रकार २० ते २२ सप्टेंबर दरम्यान घडला.
दिलीप दगडूबा जाधव (वय ३६), राम जाधव (दोघे रा. टेंभे अंतरवाला, सामनगाव रोड ता.जि. जालना), रोहित माणिक थोरात (वय ३०, रा. कोरटी उमरज ता. कराड जि. सातारा), अभिषेक वसंत खांबे (वय २७, रा. पेरले उमरज ता. कराड जि. सातारा), धर्मा अनुबा जाधव (वय २५. रा. वाघोटा ता. माजलगाव जि. बीड), भगवान छगन कनगरे (वय ३२, रा. अन्वी ता. बदनापुर जि. जालना) अशी अटक आरोपींची नावे आहे.
हेदेखील वाचा : Swami Chaitanyananda: ‘त्या’ 3 महिला, एक सिक्रेट ईमेल आणि…काय होतो चैतन्यानंदाचा ‘VVIP Game’, कसा झाला पर्दाफाश
या प्रकरणात वैभव रमेश खरात (वय १७, रा. भीमराज नगर, हिमायतबाग) याने फिर्याद दिली. त्यानुसार, वैभव हा आई-वडील व भावासोबत राहतो. मजुरीचे काम करणारे त्यांचे आई-वडील काही वर्षांपूर्वी ऊसतोडीसाठी जालना येथे जात होते. त्यावेळी त्यांची ओळख मुकादम राम जाधव याच्यासोबत झाली होती.
अखेर गुन्हा दाखल
वैभवची सुटका झाल्यानंतर त्याने वंचित बहुजन आघाडीचे युवा शहर अध्यक्ष संदीप जाधव यांना सर्व हकीकत सांगितली. त्यावर जाधव यांनी मुलाला व त्याच्या नातेवाईकांना बेगमपुरा पोलिसांकडे घेऊन जात तक्रार केली. बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी खरात दाम्पत्यांची सुटका करत सहा आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलिसांकडून करण्यात आली.
हेदेखील वाचा : Pune Crime: कामावरून काढल्याचा बदला! २ मजुरांनी ठेकेदाराच्या ३ वर्षीय मुलीचं अपहरण; नंतर इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये…